६१ विस्तार अधिकारी, ग्रामसेवकांची खांदेपालट
By admin | Published: May 11, 2016 12:32 AM2016-05-11T00:32:13+5:302016-05-11T00:32:13+5:30
जि.प. प्रशासनाच्या वतीने वर्ग तीन आणि चार मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्याची प्रक्रिया ७ मे शनिवारपासून सुरू झाली आहे.
बदली प्रक्रिया : ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक बदलले
अमरावती : जि.प. प्रशासनाच्या वतीने वर्ग तीन आणि चार मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्याची प्रक्रिया ७ मे शनिवारपासून सुरू झाली आहे. बदली प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकारी विस्तार अधिकारी व ६१ ग्रामसेवकांच्या बदल्या केल्या आहेत. यात पंचायत विभागाने आपसी, विनंती, प्रशासकीय अशा बदल्या केल्या आहेत.
जिल्हा परिषद प्रशासनातर्फे दरवर्षी मे महिन्यात बदलीची प्रक्रिया राबविले जाते. यंदाही ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून समुपदेशनाव्दारे सार्वत्रिक बदल्याची अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या डॉ पंजाबराव देशमुख सभागृहात अध्यक्ष सतीश उईके, सीईओ सुनील पाटील, डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, जे.एन आभाळे यांच्या उपस्थित सुरू झाली आहे. बदली प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी बांधकाम विभागातील कनिष्ठ सहायक, स्थापत्य अभियंता यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील ८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सिंचन विभागातील चार कर्मचाऱ्यांच्याा प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्या अशा एकूण १८ कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्हा परिषद प्रशासनाने केल्या आहेत. जिल्हा परिषद पंचायत विभागाने मंगळवारी दोन विस्तार अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय दोन, १ विनंती, तर ग्रामविकास अधिकारी प्रशासकीय १ विनंती २ आपसी चार ग्रामसेवकांच्या १७ प्रशासकीय, २२ विनंती, आणी १२ ग्रामसेवकांच्या आपसी बदल्या करण्यात आल्या आहेत. अशा एकूण ६१ बदल्या केल्या आहेत. यावेळी अध्यक्ष सतीश उईके, मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील, डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, जे.एन आभाळे, जिल्हा परिषद कर्मचारी पकंज गुल्हाने, श्रीकांत मेश्राम, प्रशांत धर्माळे, हृषीकेश कोकाटे, विजय कविटकर, सुदेश तोटेवार, कल्पना दाभाडे, ईश्र्वर राठोड आदीचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)
महिला, बालकल्याण बदल्या १४ मे रोजी
जिल्हा परिषद प्रशासनाने मंगळवारी पंचायत, महिला व बालकल्याण विभागाच्या बदल्या करण्याचे जाहीर केले होते. मात्र अचानक काही तांत्रिक कारणामुळे महिला व बालकल्याण विभागाच्या बदल्या १० मे रोजी रद्द क रण्यात आल्या आहेत. त्यामुळे केवळ पंचायत विभागाच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महिला व बालकल्याण विभागाच्या बदल्या १४ मे रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.