जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पांत ६१ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:13 AM2021-07-25T04:13:10+5:302021-07-25T04:13:10+5:30
अमरावती : तीन दिवसांपासून जिल्ह्यात व धरण क्षेत्रात दमदार पाऊस कोसळल्याने प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. जिल्ह्यातील चार सिंचन प्रकल्पात ...
अमरावती : तीन दिवसांपासून जिल्ह्यात व धरण क्षेत्रात दमदार पाऊस कोसळल्याने प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. जिल्ह्यातील चार सिंचन प्रकल्पात ६१ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. ही आकडेवारी २४ जुलैपर्यंतची असून त्यासंदर्भाचा अहवाल जलसंपदा विभागाने शनिवारी जारी केला.
जिल्ह्यातील एकमेव मोठा प्रकल्प असलेला तसेच अमरावती शहराला ज्या प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो, त्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात शनिवारी दुपारी ४ वाजेपर्यंत ५३.३४ टक्के पाणीसाठा साचला आहे. तसेच शहानूर मध्यम प्रकल्पात ६१.१० टक्के पाणीसाठा आहे. चंद्रभागा प्रकल्पात ७१.६३ टक्के, पूर्णा ६१.८० टक्के, सपन ६७.२० टक्के, पंढरी प्रकल्पात ८.२६ टक्के पाणीसाठा साचला आहे. शहानूर प्रकल्पाचे दोन, चंद्रभागा तीन, पूर्णा नऊ तर सपन प्रकल्पाचे चार गेट उघडण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.