मध्य रेल्वेची मालवाहतुकीद्वारे ६१० कोटींची कमाई; आतापर्यंतची सर्वेात्तम वाढ

By गणेश वासनिक | Published: October 12, 2023 01:25 PM2023-10-12T13:25:00+5:302023-10-12T13:36:19+5:30

एप्रिल ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत ४१.६६ मेट्रिक टन लोडिंग

610 crores earned by Central Railway through freight | मध्य रेल्वेची मालवाहतुकीद्वारे ६१० कोटींची कमाई; आतापर्यंतची सर्वेात्तम वाढ

मध्य रेल्वेची मालवाहतुकीद्वारे ६१० कोटींची कमाई; आतापर्यंतची सर्वेात्तम वाढ

अमरावती : मध्य रेल्वे मुंबई विभागाने एप्रिल ते सप्टेबर २०२३ या कालावधीत मालवाहतुकीद्वारे ४१.६६ मेट्रिक टन लोडिंग केले आहे. रेल्वेला ६१० कोटींची कमाई करण्यात आली असून, आतापर्यंतची सर्वेात्तम वाढ नोंदविण्यात आली आहे.

मध्य रेल्वेने सप्टेंबर-२०२३ मध्ये ५.७६ दशलक्ष टन मालवाहतूक केली आहे. यात ६१० कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवले गेले. सप्टेंबर-२०२३ महिन्यासाठी मध्य रेल्वेचे मालवाहतूक ५.७६ दशलक्ष टन होती, तर सप्टेंबर-२०२२ महिन्यासाठी ५.६५ दशलक्ष टन लोडिंग होते. त्यात १.९० टक्क्याची झालेली वाढ, सप्टेंबरच्या कोणत्याही महिन्यातील सर्वोत्तम लोडिंग आहे. मध्य रेल्वेने एप्रिल-सप्टेंबर २०२३-२४ या कालावधीसाठी ४१.६६ मेट्रिक टन लोडिंग नोंदवली आहे. एप्रिल-सप्टेंबर-२०२२ मध्ये ३७.९९ मेट्रिक टन पेक्षा ९.७० टक्के झालेली वाढ ही मध्य रेल्वेवरील आतापर्यंतची सर्वोत्तम आहे. वार्षिक प्रारंभिक लोडिंग देखील आहे.  नेट टन किलोमीटर सप्टेंबर-२०२२ च्या ३२०३ दशलक्षच्या तुलनेत सप्टेंबर-२०२३ मध्ये ६.०५टक्क्याने वाढून ३७१५ दशलक्ष झाले आहे. मध्य रेल्वेने सप्टेंबर २०२२ मधील ५७१ कोटी रुपयांच्या तुलनेत सप्टेंबर २०२३ मध्ये ६१० कोटी रुपयांचा मालवाहतूक महसूल मिळविला आहे.

फेस्टीव्हल विशेष गाड्या

मध्य रेल्वेने सप्टेंबर २०२३ मध्ये गणपती, वेलकन्नी आणि ओणम स्पेशल गाड्यांसह ३५३ विशेष प्रवासी गाड्या चालवल्या. मध्य रेल्वेने १० पूर्ण शुल्कासह दर (एफटीआर) विशेष गाड्या चालवल्या. मध्य रेल्वेने लीज पार्सल सर्व्हिसेस मधून २.६६ कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे. यामध्ये ००११३ मुंबई ते संकराईल गुड्स यार्ड (पश्चिम बंगाल) ८ सेवा, भिवंडी/जळगाव/नागपूर ते आजरा (आसाम) ३ सेवा, गोधनी/कलमेश्वर ते न्यू तिनसुकिया (आसाम) २ सेवा, सावदा ते आदर्श नगर दिल्ली- १ सेवा आणि देहू रोड-बाडमेर (राजस्थान) १ सेवा चालविण्यात आल्या आहेत.

Web Title: 610 crores earned by Central Railway through freight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.