धामणगावातील ६२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासनाची वारी, घरकुल लाभार्थींच्या दारी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:13 AM2021-03-25T04:13:33+5:302021-03-25T04:13:33+5:30

अडीच हजार घरांना एकाच दिवशी भेटी धामणगाव रेल्वे : तालुक्यातील २ हजार ५०० घरकुलांचे काम मार्च महिना संपण्यापूर्वी सुरू ...

In 62 Gram Panchayats of Dhamangaon, 'Administration Wari, Gharkul Beneficiaries' Doors' | धामणगावातील ६२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासनाची वारी, घरकुल लाभार्थींच्या दारी’

धामणगावातील ६२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासनाची वारी, घरकुल लाभार्थींच्या दारी’

Next

अडीच हजार घरांना एकाच दिवशी भेटी

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील २ हजार ५०० घरकुलांचे काम मार्च महिना संपण्यापूर्वी सुरू व्हावे, यासाठी ६२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासनाची वारी, घरकुल लाभार्थींच्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात आला

धामणगाव तालुक्यात ४ हजार १०७ घरकुलांना मंजुरी मिळाली होती. यातील काही घरकुलांना कामे पूर्ण झाली. मात्र, अंजनसिंगी, जुना धामणगाव, वरूड बगाजी, मंगरूळ दस्तगीर, देवगाव, निंबोली, तळेगाव दशासर, शेंदूरजना खुर्द या पंचायत समिती सर्कलमधील अडीच हजार घरकुल जागेअभावी रखडले होते. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी माया वानखडे यांनी आठही सर्कलमध्ये नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. सोमवारी ६२ नोडल अधिकाऱ्यांनी घरकुलापासून वंचित असलेल्या अर्जदारांच्या घरी भेटी दिल्या. गटविकास अधिकारी माया वानखडे यांनी स्वतः बारा गावांचा दौरा करून घरकुलाबाबत समस्या ऐकून घेतल्या. तीन दिवसांत युद्धस्तरावर जागेचा प्रश्न निकाली लावून घरकुलाचा पहिला हप्ता मार्च महिना संपण्यापूर्वी लाभार्थींच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी वानखडे यांनी दिली

----------------------

कॅप्शन- जुना धामणगाव येथे प्रशासन घरकुल लाभार्थ्यांच्या दारी उपक्रमात बीडीओ माया वानखडे, ग्रामविकास अधिकारी अहेरवार.

Web Title: In 62 Gram Panchayats of Dhamangaon, 'Administration Wari, Gharkul Beneficiaries' Doors'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.