वर्षभरात ६२ हजार ५१ मजुरांच्या हाताला कामे मिळाले

By admin | Published: April 2, 2016 12:07 AM2016-04-02T00:07:47+5:302016-04-02T00:07:47+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्र्रामीण रोजगार हमी योजनेची जिल्ह्यात सन २०१५ मध्ये १०७ टक्के कामे झाली आहेत.

62 thousand 51 laborers got jobs in hand | वर्षभरात ६२ हजार ५१ मजुरांच्या हाताला कामे मिळाले

वर्षभरात ६२ हजार ५१ मजुरांच्या हाताला कामे मिळाले

Next

उद्दिष्ट्यपूर्ती : प्रशासनाने गाठले १०७ टक्के लक्ष्य
अमरावती : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्र्रामीण रोजगार हमी योजनेची जिल्ह्यात सन २०१५ मध्ये १०७ टक्के कामे झाली आहेत. या माध्यमातून वर्षभरात जिल्ह्यात ६२ हजार ५१ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. निमिर्तीच्या सुमारे ४८.५२ मनुष्यदिवसांच्या उद्दिष्टांपैकी सद्य:स्थितीत ५३.६५ लक्ष मनुष्यदिवसाची निर्मिती गाठण्यात प्रशासनाला यश आले आहे.
रोजगार नसलेल्यांसाठी वर्षातील किमान ठराविक दिवस रोगजार हमी देणारी ही योजना रोजगार पुरविणारी योजना म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या व प्रभावीपणे चालविलेल्या योजनांपैकी ही एक योजना आहे. योजनेंतर्गत केंद्र शासन १०० दिवस प्रतिकुटंूब रोजगाराची हमी देते. १०० दिवस प्रती कुटंूब मजुरांच्या खर्चासाठी निधी पुरवते. प्रतीकुटंूब शंभर दिवसावरील प्रत्येक मजुरांच्या खर्चाचा आर्थिक भार राज्य शासन उचलते. या महत्वाकांक्षी योजनेची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात झालेल्या कामावरून लक्षात येते. रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्याने जिल्ह्यात चांगले काम झाले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. जिल्ह्यात रोहयो अंतर्गत सिंचन विहिरी, बंधारे, मातीनाला बांध, शेततळे, नाला सरळीकरण व खोलीकरणासह अन्य कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आली आहेत. यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

रोहयो खर्चात जिल्हा आघाडीवर
रोजगार हमी योजनेंतर्गत ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यात सुमारे १३९ कोटी १४ लाख इतका खर्च करण्यात आला आहे. मागील वर्षी सन २०१४-१५ मध्ये हाच खर्च जिल्ह्यात १०५ कोटी रूपये करण्यात आला होता. यामध्ये यंदा वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

जिल्हाधिकारी, रोहयो उपजिल्हाधिकारी व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार हमी योजनेचे अचूक नियोजन केल्याने हे शक्य झाले आहे. चालू वर्षातही अशीच कामे करण्याचा आमचा मानस आहे. नागरिकांनी कामे निवडून ग्रामसेभतून मंजूर कामाचे प्रस्ताव सादर करावे. यासर्व कामासाठी सर्वाचे सहकाऱ्यांची ही फलश्रुती आहे.
- उन्मेश देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, रोहयो विभाग जि.प.

Web Title: 62 thousand 51 laborers got jobs in hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.