६३१ पॉझिटिव्ह, तीन मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:13 AM2021-03-07T04:13:24+5:302021-03-07T04:13:24+5:30
जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आता ३९,०७८ झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या अहवालानुसार, अमरावती शहरातील अमृत कॉलनीतील ३१ वर्षीय ...
जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आता ३९,०७८ झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या अहवालानुसार, अमरावती शहरातील अमृत कॉलनीतील ३१ वर्षीय महिला, चांदूर रेल्वे येथील ८१ वर्षांचा पुरुष व दिग्रस येथील ३५ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सद्यस्थितीत कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत मृतांचे प्रमाण १.४५ टक्के आहे.
जिल्ह्यात रुग्णसंख्या दररोज ८०० ते ९०० दरम्यान नोंद असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात लाॅकडाऊन करण्यात आले. शनिवारपासून यामध्ये शिथिलता देण्यात आली. शिथिलता मिळताच मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे निदर्शनास येताच दंडात्मक कारवाईसाठी चौथ्यांदा २० पथकांची नियुक्ती करण्यात आली.
बॉक्स
३६ आरोग्य केंद्रांमध्ये सोमवारपासून ज्येष्ठांचे लसीकरण
महापालिका क्षेत्रात ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण होत असताना अद्याप जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लसीकरण सुरू झालेले नव्हते. आता ३६ आरोग्य केंद्रांमधून सोमवारपासून कोरोना लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य यंत्रणाद्वारे देण्यात आली. यासाठी किमान एक लाख डोज जिल्ह्यासाठी मागणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
बॉक्स
दोन खासगी रुग्णालयांना पथकांची नोटीस
उपचारार्थ दाखल संक्रमित रुग्णाला जादा बिलाची आकारणी केल्याने जिल्हा प्रशासनाच्या पथकांद्वारे गाडगेनगर परिसरातील एक व बडनेरा मार्गावरील एक अशा दोन रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले. महापालिकेच्या पथकासह जिल्हा प्रशासनाच्या पथकांद्वारे सातत्याने भेटी देऊन नियमित तपासणी करण्यात येते. त्याचाच हा एक भाग असल्याचे सांगण्यात आले.