३६ कोटीतून साकारणार ६४ कि.मी.चे रस्ते

By admin | Published: March 24, 2016 12:34 AM2016-03-24T00:34:00+5:302016-03-24T00:34:00+5:30

ृमुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे.

64 kms of road to be completed from 36 crores | ३६ कोटीतून साकारणार ६४ कि.मी.चे रस्ते

३६ कोटीतून साकारणार ६४ कि.मी.चे रस्ते

Next

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना : सर्व तालुक्यांचा समावेश
प्रदीप भाकरे अमरावती
ृमुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून जिल्ह्यातील रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. या योजनेंतर्गत सन २०१५-१६ या वित्तीय वर्षात जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जेन्नती करण्याचा प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामध्ये ३६.४९ कोटी रुपये खर्चून ६४ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जाणार आहे.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने २०१५ मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यान्वित केली होती. या योजनेच्या माध्यमातून सन २०१५-१६ मध्ये राज्यभरात २ हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्याचे उद्दिष्ट होते. या योजनेत २०१५-१६ मध्ये प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देण्यात आले. मात्र, योजनेला उशीरा सुरुवात झाली. राज्य शासनाकडूनही निधी उपलब्ध झाला नव्हता. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला निधीची प्रतीक्षा होती. ती प्रतीक्षा २१ मार्चला ग्रामविकास विभागाने काढलेल्या शासन निर्णयामुळे फलद्रुप झाली आहे. जिल्ह्यातील १५ रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रधानमंत्री /मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या मुख्य अभियंत्यांनी रस्त्याच्या दर्जोन्नती करण्यासाठी ई-टेंडरिंग करुनच कार्यारंभाचे आदेश द्यावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. सदर रस्त्यांसाठी लागणारी जीन कुठल्या विभागाच्या ताब्यात आहे, याची खात्री करावी करावी लागेल.

देखभाल दुरुस्तीसाठी अडिच कोटी
चौदाही तालुक्यातील एकूण ६४ किलोमिटरच्या लांबीच्या रस्त्याला ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असताना या कामाची ५ वर्षे नियमित देखभाल व दुरुस्ती करिता २.५५ कोटींची तरतूद केली आहे. ही तरतूद रस्तानिहाय तालुकास्तरावर करण्यात आली.लवकरच कामाला प्रारंभ होणार आहे.

हतरु रुईपठारसाठी सर्वाधिक निधी
अमरावती तालुक्यातील दोन रस्ते व अन्य १३ तालुक्यातील प्रत्येकी एक रस्त्याच्या कामाला निधीला मंजुरात मिळाली. यात चिखलदरा तालुक्यातील हतरू रुईपठार, भुत्रूम या ११ किलोमेीर रस्त्यासाठी ९.०८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर सर्वात कमी निधी रामा ते टाकरखेडा या दीड किलोमीटर रस्त्यासाठी मंजूर झाला आहे.

१४ तालुक्यातील रस्त्यांचा समावेश
अचलपूर तालुक्यातील रामा, येलकी, सावळापूर रस्त्यासाठी १३७.२७ लाख, टाकळी जहांगीर ते अंगोडासाठी ८२.३५ लाख, रामा-राजुरा - मासोद, वडगाव शेवती, नांदगावसाठी २४१.२७ लाख, रामा (विहिगाव) रत्नापूर-कापूसतळणी रस्त्यासाठी १७९.०४ लाख, रामा - लाखनवाडीसाठी २५०.०५ लाख, शिंगणवाडी-भुजवाडा रस्ता - १८५.०१ लाख, रामा (२८६) वरुड बगाजीसाठी ९९.३९ लाख, बिबामल, टिटंबा घुटी रस्त्यासाठी ४४९.३७ लाख, रामा (३०५) - अंबाडा, चिंचोली, गवळी रस्त्यासाठी २००.४३ लाख, एरंडगाव ते दादापूर रस्त्यासाठी १४०.६९ लाख, रामा (२९४) - कौडंण्यपूर, तरोडा, धामंत्री - उमरखेड या ५.१० किमी रस्त्यासाठी २३२.३२ लाख आणि वरुड तालुक्यातील रामा (२२५), अमडापूर, मांगरुळी पेठ रस्त्यासाठी २४९.२० अशा एकूण १५ रस्त्यांसाठी ३६४९.७५ लाख रुपये मंजुर करण्यात आले आहेत.

Web Title: 64 kms of road to be completed from 36 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.