६५ टक्के मतदार पन्नाशीच्या आतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 01:18 AM2019-04-01T01:18:48+5:302019-04-01T01:19:10+5:30
जिल्ह्यात सद्यस्थितीत २४ लाख सहा हजार ६१९ एकूण मतदार आहेत. यामध्ये पन्नाशीच्या आतील १५ लाख ३८ हजार ९१२ मतदारांचा समावेश आहे. या मतदारांचा टक्का ६५.१२ इतका आहे. साठी पार केलेले चार लाख ७९ हजार २६ मतदार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात सद्यस्थितीत २४ लाख सहा हजार ६१९ एकूण मतदार आहेत. यामध्ये पन्नाशीच्या आतील १५ लाख ३८ हजार ९१२ मतदारांचा समावेश आहे. या मतदारांचा टक्का ६५.१२ इतका आहे. साठी पार केलेले चार लाख ७९ हजार २६ मतदार आहेत. यंदा १८ ते १९ वयोगटातील ३१ हजार ४३१ नवमतदार वाढले आहेत. यामध्ये १८ हजार ७१६ तरूण अन् १२ हजार ७१५ तरूणींचा समावेश आहे. यंदाच्या निवडणुकीत हे उत्साही मतदार निर्णायक ठरणार आहेत.
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आयोगाद्वारा वेळोवेळी अभियान राबविण्यात आले. महाविद्यालयात प्रवेश घेतेवेळी प्रवेश अर्जावर मतदान जागृतीविषयक संदेश अन् वर्षभर जागृती यामुळे सहा महिन्यांत ३१ हजारांवर युवा मतदारांची नोंदणी झाली. यामध्ये मुलींच्या तुलनेत मुलांचे प्रमाण अधिक आहे. धामणगाव विधानसभा मतदारसंघात २६२८ मुले, तर २०३७ मुली, बडनेरा मतदारसंघात १७९५ मुले, १४१८ मुली, अमरावती मतदारसंघात २७०९ मुले व १९८३ मुली, तिवसा मतदारसंघात २२८८ मुले, १४९७ मुली, दर्यापूर मतदारसंघात २७५८ मुले व १६१३ मुली, मेळघाट मतदारसंघात २११५ मुले व १३२५ मुली, अचलपूर मतदारसंघात २३२६ मुले व १४४५ मुली तसेच मोर्शी विधानसभा मतदारसंघात २०९४ मुले व १३९४ मुली नवमतदार आहेत. १८ ते १९ या वयोगटातील हे मतदार आहेत. जिल्ह्यात २० ते २९ वर्षांतील ४,३९,९४७ मतदार आहेत. यामध्ये धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात ५३,८९३, बडनेरा ५४,१३३, अमरावती ६३,२२५, तिवसा ४९,७५२, दर्यापूर ५५,२९७, मेळघाट ६१,३२३, अचलपूर ५०,७२७ व मोर्शी विधानसभा मतदारसंघात ५१,५९७ मतदार आहेत.
४० ते ४९ वयोगटातील सर्वाधिक
जिल्ह्यात २० ते २९ या वयोगटातील चार लाख ३९ हजार ९४७ मतदार आहेत. यामध्ये दोन लाख ३६ हजार ९१५ युवक व दोन लाख तीन हजार १८ युवतींचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाच लाख ४४ हजार ९२ मतदार ३० ते ३९ या वयोगटात आहेत. यामध्ये दोन लाख ७१ हजार ९०४ पुरूष, तर दोन लाख ७२ हजार १६७ महिला मतदारांचा समावेश आहे. ४० ते ४९ वयोगटात पाच लाख २३ हजार ४४२ मतदार आहेत. यामध्ये दोन लाख ७१ हजार ९०४ पुरूष व दोन लाख ५२ हजार ९७५ महिला मतदार आहेत.