पाच विद्यार्थिनींना ६५ हजारांची शैक्षणिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:08 AM2018-04-05T00:08:21+5:302018-04-05T00:08:21+5:30

अचलपूर तालुक्यातील वडगाव फत्तेपूर येथे विश्वासराव नारायणराव चाफले यांनी सधनतेचे प्रदर्शन न करता, तब्बल ६५ हजार रुपयांची गावातील शालेय विद्यार्थिनींच्या भविष्याकरिता तरतूद करून आपली कर्तव्यपरायणता सिद्ध केली. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांचे हे दातृत्व आहे.

65 thousand educational aid to five students | पाच विद्यार्थिनींना ६५ हजारांची शैक्षणिक मदत

पाच विद्यार्थिनींना ६५ हजारांची शैक्षणिक मदत

Next
ठळक मुद्देचाफले यांचा आदर्श : वाढदिवसाऐवजी संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अचलपूर तालुक्यातील वडगाव फत्तेपूर येथे विश्वासराव नारायणराव चाफले यांनी सधनतेचे प्रदर्शन न करता, तब्बल ६५ हजार रुपयांची गावातील शालेय विद्यार्थिनींच्या भविष्याकरिता तरतूद करून आपली कर्तव्यपरायणता सिद्ध केली. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांचे हे दातृत्व आहे.
वडगाव फत्तेपूर येथील शेतकरी विश्वासराव चाफले यांचा ६५ वा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना त्यांच्या मित्रांनी मांडली होती. त्याऐवजी मुलींना मदत करण्याची इच्छा चाफले यांनी मांडली. त्यांनी वडगावातीलच विद्यामंदिर प्राथमिक शाळेशी संपर्क साधला. पहिलीतील विद्यार्थिनींच्या नावे प्रत्येकी १३ हजार रुपयांचा बाँड केला. विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सिरस्कार यांच्याकडे त्यांनी मुलींची निवड करण्याची जबाबदारी सोपविली. यामध्ये जाती-धमार्चा अडसर न करण्याचा दिलेला सल्ला त्यांनी पाळला.
विद्यमान सत्तापक्ष शेतकºयांच्या नावाने खडे फोडत असले तरी आपल्याकडील पैसा सत्कर्मी लागावा, हीच त्यांची मनीषा असते. हेच विश्वासराव चाफले यांनी आपल्या कृतीतून दाखविले आहे.

रक्कम थेट पोस्टाच्या खात्यात जमा
मुख्याध्यापक रतन सिरस्कार यांच्या माध्यमातून पाच विद्यार्थिनींची निवड झाल्यानंतर त्यांच्यासह पालकांना अचलपूर येथील डाक कार्यालयात बोलावण्यात आले व तेथे मुदती ठेवीच्या रूपाने प्रत्येकीच्या नावे १३ हजारांची रक्कम जमा करण्यात आली. साडेनऊ वर्षांच्या दीर्घ मुदतीचा हा बाँड आहे.

पहिल्यांदा प्रत्येकी पाच हजार देण्याची कल्पना मांडली होती. मात्र, विश्वासराव चाफले यांनीच पाच विद्यार्थिनींना १३ हजार देण्याची कल्पना मांडली. त्यांनी सत्पात्री दानाचा मार्ग दाखविला आहे. त्यांचा कित्ता गिरवून समाजोत्थान करता येईल.
- रतन सिरस्कार, मुख्याध्यापक, विद्यामंदिर

Web Title: 65 thousand educational aid to five students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.