६६ हजारावर अंगणवाडीतही चिमुकल्यांना इंग्रजीचे धडे; ग्रामीण भागातील २ हजार ५९२ केंद्रात

By जितेंद्र दखने | Published: July 15, 2024 07:52 PM2024-07-15T19:52:57+5:302024-07-15T19:53:41+5:30

नवा प्रयोग : ग्रामीण भागातील २ हजार ५९२ केंद्रात

66,000 English lessons for children even in Anganwadi In 2 thousand 592 centers in rural areas | ६६ हजारावर अंगणवाडीतही चिमुकल्यांना इंग्रजीचे धडे; ग्रामीण भागातील २ हजार ५९२ केंद्रात

६६ हजारावर अंगणवाडीतही चिमुकल्यांना इंग्रजीचे धडे; ग्रामीण भागातील २ हजार ५९२ केंद्रात

अमरावती: अंगणवाडीतील बालकांना आनंददायी शिक्षण मिळावं, बालकांच्या मनातील इंग्रजी विषयांची भीती कमी व्हावी तसेच इंग्रजी विषयात त्यांना बालपणापासूनच आवड निर्माण व्हावी आणि पालकांचा इंग्रजी शिक्षणाकडे वाढता कौल लक्षात घेता त्यांच्या अपेक्षाही पूर्ण व्हाव्यात यासाठी आता जिल्ह्यातील २ हजार ५९२ अंगणवाडी केंद्रातील ६६ हजार ३६३ चिमुकल्यांना इंग्रजी शिक्षण शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. महिला व बालकल्याण विभागाच्या या नाविण्यपूर्ण उपक्रमाचा श्रीगणेशा शिराळा येथील केंद्रात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.

इंग्रजी शिक्षण हे आता काळाची गरज बनली आहे. इंग्रजी ही रोजच्या बोलण्यातील भाषा होत आहे. जास्तीत ज्ञान आजही इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. इंग्रजी ही संवादाची, व्यापारांची आणि आंतरराष्ट्रीय भाषा असल्यामुळे या पिढीतील बालके इंग्रजी विषयात कुठेही कमी पडू नये किंवा इंग्रजी विषयाबद्दल त्यांच्या मनात भीती असू नये हा उद्देश समोर ठेवून राबविला जात आहे. या उपक्रमात दर महिन्यात दोन कविता, काही परिचित शब्द, काही क्रियात्मक शब्द, तीन अल्फाबेट आणि दोन अंक असा अभ्यासक्रम अंगणवाडी सेविकांसाठी तयार केला आहे. यासाठी सर्व पर्यवेक्षिकांना,अंगणवाडी सेविकांना जिल्हास्तरावर प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्रात हा अभ्यासक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरावरून सनियंत्रण ठेवले जाणार आहे.
 
दरमहिन्याला मूल्यांकन
प्रत्येक महिन्याच्या शेवटी पर्यवेक्षकेमार्फत दुसऱ्या अंगणवाडी केंद्रांचे मूल्यांकन केले जाणार असून हा अभ्यासक्रम किती उपयुक्त आहे. याची पडताळणी ही करण्यात येणार असल्याचे महिला व बालकल्याण विभागाचे डेप्युटी सीईओ डॉ. कैलास घोडके यांनी सांगितले.
 
सहा वर्षापर्यंत बालकांचा ९० टक्के विकास होतो. त्यामुळे बालक कोणतीही भाषा सहज अवगत करू शकते.त्यामुळे इंग्रजी ही भाषा सुद्धा अंगणवाडी केंद्रातील बालके सहज अवगत करतील आणि नवीन नवीन शब्द त्यांना ज्ञात होतील. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारा अमरावती हा राज्यातील पहिला जिल्हा आहे. - सौरभ कटियार, जिल्हाधिकारी अमरावती

Web Title: 66,000 English lessons for children even in Anganwadi In 2 thousand 592 centers in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.