कौंडण्यपूर, धामोरीच्या विकासासाठी ६.६५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 10:21 PM2018-02-10T22:21:30+5:302018-02-10T22:24:41+5:30

विधानसभा मतदारसंघातील श्रीक्षेत्र कौंडण्यपूर व भातकुली तालुक्यातील धामोर गावांकरिता पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून ६.६५ कोटींची तरतूद मान्य करण्यात आली आहे.

6.65 crores for the development of Koundanayapur, Dhamori | कौंडण्यपूर, धामोरीच्या विकासासाठी ६.६५ कोटी

कौंडण्यपूर, धामोरीच्या विकासासाठी ६.६५ कोटी

Next
ठळक मुद्देयशोमती ठाकूर यांचे प्रयत्न : अनुक्रमे ४.६०, आणि २.०५ कोटींचा निधी मंजूर

आॅनलाईन लोकमत
तिवसा : विधानसभा मतदारसंघातील श्रीक्षेत्र कौंडण्यपूर व भातकुली तालुक्यातील धामोर गावांकरिता पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून ६.६५ कोटींची तरतूद मान्य करण्यात आली आहे.
आमदार यशोमती ठाकूर यांनी केलेल्या प्रयत्नाने विदर्भाची पंढरी श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे २० कोटीे रुपयांच्या विकास आराखड्यातून विकास साधला जात आहे. त्यात आणखी भर पाडत महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने पर्यटनस्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत श्रीक्षेत्र कौंडण्यपूर रुख्मिणी विदर्भपीठ कौंडण्यपूर व भातकुली तालुक्यातील संसद आदर्श ग्राम धामोरी या गावांना पायाभूत सुविधा व विकास कामासाठी अनुक्रमे ४६० लक्ष, व २०५ लक्ष असे एकूण ६६५ लक्ष अर्थसंकल्प नियतव्ययात मंजूर केले आहेत. नुकताच याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला आहे. याबद्दल सर्व वारकरी, गावकरी व पदाधिकारी यांनी आमदार यशोमती ठाकूर व शासनाचे आभार मानले आहेत.

Web Title: 6.65 crores for the development of Koundanayapur, Dhamori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.