६७ टक्के, धक्कादायक निकाल येणार!

By admin | Published: October 15, 2014 11:12 PM2014-10-15T23:12:10+5:302014-10-15T23:12:10+5:30

जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांतील २२ लाख २१ हजार ६२३ मतदारांपैकी ६७.२६ टक्के मतदारांनी बुधवारी मतदानाचा हक्क बजावला. बहुतांश मतदारसंघांत धक्कादायक निकाल येतील, असा अंदाज आहे.

67 percent, shocking results come out! | ६७ टक्के, धक्कादायक निकाल येणार!

६७ टक्के, धक्कादायक निकाल येणार!

Next

मतदानात वाढ : अमरावती-बडनेऱ्यात गोंधळ, मतदान यंत्र बंद, मुस्लिम भागात खडा पहारा
अमरावती : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांतील २२ लाख २१ हजार ६२३ मतदारांपैकी ६७.२६ टक्के मतदारांनी बुधवारी मतदानाचा हक्क बजावला. बहुतांश मतदारसंघांत धक्कादायक निकाल येतील, असा अंदाज आहे.
२००९ च्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत मतदानात ५ टक्यांनी वाढ झाली. एकूण १३५ उमेदवारांचे राजकीय भाग्य मतदान यंत्रात बंद झाले. १९ आक्टोबर रोजी मतमोजणीनंतर लगेच निकाल जाहीर होतील.
मतदान प्रक्रियेदरम्यान बडनेरा व अमरावती मतदारसंघात परस्परविरोधी उमेदवारांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याच्या घटना घडल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता. चांदूरबाजार तालुक्यात सुमारे १० तर मोर्शी मतदारसंघात ४ मतदान यंत्रांत बिघाड झाला होता; तथापि ही बाब वेळीच लक्षात आल्याने मतदान यंत्र बदलवून देण्यात आलेत.
अमरावती मतदारसंघात काँग्रेसचे रावसाहेब शेखावत व भाजपचे सुनील देशमुख यांच्यात थेट लढत झाली. शिवसेनेचे प्रदीप बाजड यांचाही उल्लेखनीय प्रभाव होता. बडनेरा मतदारसंघात काँग्रेसच्या सुलभा खोडके, शिवसेनेचे संजय बंड, राष्ट्रवादी समर्थित रवी राणा आणि भाजपचे तुषार भारतीय यांच्यात लढत झाली.
धामणगावात भाजपचे अरुण अडसड, काँग्रेसचे वीरेंद्र जगताप, शिवसेनेचे सिध्देश्वर चव्हाण आणि बसपाचे अभिजित ढेपे यांच्यात सामना रंगला. मेळघाट मतदारसंघात काँग्रेसचे केवलराम काळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकुमार पटेल व भाजपचे प्रभुदास भिलावेकर यांच्यात डाव रंगला.
अचलपूर मतदारसंघात भाजपचे अशोक बनसोड, प्रहारचे बच्चू कडू, काँग्रेसचे बबलू देशमुख, शिवसेनेच्या सुरेखा ठाकरे व राष्ट्रवादीच्या वसुधा देशमुख यांच्यात लढत झाल्याचे चित्र होते. तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, भाजपच्या निवेदिता चौधरी, शिवसेनेचे दिनेशनाना वानखडे यांच्यात लढत झाली. मोर्शी मतदारसंघात भाजपचे अनिल बोंडे, काँग्रेसचे नरेशचंद्र ठाकरे, राष्ट्रवादीचे हर्षवर्धन देशमुख, शिवसेनेचे उमेश यावलकर यांच्यात लढतीचे चित्र होते.

Web Title: 67 percent, shocking results come out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.