६.७४ कोटींची कामे गुंडाळणार?
By Admin | Published: November 19, 2014 10:30 PM2014-11-19T22:30:53+5:302014-11-19T22:30:53+5:30
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भुमिपूजनाचा धडाका लावित जिल्ह्यातील आमदारांनी मंजूर केलेल्या कामांना चांगलाच फटका बसणार आहे. ऐनवेळी मंजूर परंतु आॅर्डर न निघालेल्या कामांचा फेरआढावा भाजपा
जितेंद्र दखणे - अमरावती
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भुमिपूजनाचा धडाका लावित जिल्ह्यातील आमदारांनी मंजूर केलेल्या कामांना चांगलाच फटका बसणार आहे. ऐनवेळी मंजूर परंतु आॅर्डर न निघालेल्या कामांचा फेरआढावा भाजपा सरकारकडून घेतला जात आहे.
जिल्हातील ९ कामे नामंजूर होण्याची दाट शक्यता असल्याने त्यासाठीच्या ४१ लक्ष रूपयांच्या निधीवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारमधील मंत्री, आमदारांनी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन निधीची खिरापत वाटली. मोठ्या गावांसह वाड्या वस्त्यांवरील मतदान काबिज करण्यासाठी आमदार निधीतील रक्कम वाटली. आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात तर अक्षरश: भुमिपूजनाची लगिनघाई सुरु होती. दिवसाकाठी चार ते पाच भुमिपूजन झाले तर अनेक ठिकाणी फलक लागले. मतदारांवरील परिणाम लक्षात घेऊन तत्कालिन मंत्री, आमदारांनी भुमिपूजनाचा धडाका लावला होता.