जिल्हा बँकेसाठी ६८ जणांचे नामांकन दाखल, ४६ अर्जांची उचल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:17 AM2021-09-04T04:17:56+5:302021-09-04T04:17:56+5:30
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज उचलणे व दाखल ...
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज उचलणे व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे ३ सप्टेंबर रोजी राज्यमंत्री बच्चू कडू, जि.प. अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, राजकुमार पटेल, माजी आमदार वीरेंद्र जगताप, संजय खोडके, सुरेखा ठाकरे, निवेदिता चाैधरी आदींसह ६८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत, तर ४६ जणांनी अर्जाची उचल केली आहे.
दि.अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक तब्बल ११ वर्षांनंतर होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय नेते कामाला लागले आहेत. गत ३१ ऑगस्टपासून अर्ज उचल व दाखल कारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ६ सप्टेंबरपर्यत नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. अनेक दिग्गजांनी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने बँकेची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे. जिल्हा बँकेच्या २१ संचालकपदासाठी येत्या ४ ऑक्टोबर रोजी ही निवडणूक होत आहे. त्यानुसार निवडणुकरिता अर्ज दाखल करण्यासाठी १ दिवसाचा अवधी शिल्लक आहे.
बॉक्स
यांनीही केले नामांकन दाखल
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी अरविंद पावडे, मोनिका संजय मार्डीकर, संजय मार्डीकर (वानखडे), अरुणा शंकर गावंडे, कांचनमाला गावंडे, दयाराम काळे, बाळासाहेब अलोणे, विद्याधर मेटकर, सुभाष पावडे, अरूण कोहळे, जयप्रकाश पटेल, संभुजी खडके, सुरेश साबळे, श्रीकांत गावंडे, दीपक कोरपे, भाेजराज काळे, धनजंय कोरपे, पंकज विधळे, किशोर कडू, अमरदीप तेलखडे, विलास अघडते, प्रिया निकम, शुभांगी वासनकर, वृषाली विघे, प्रकाश विघे, लक्ष्मी सुधीर अढाऊ, संतोष इंगोले, सुभाष मनवर, हरिभाऊ पळसकर, संतोष कोल्हे, अनिल जळमकर, नरेंद्र पाटील, रणजित चित्रकार आदींचा समावेश आहे.