शहरात आठ महिन्यात ६९ महिला वासनेच्या शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:14 AM2021-09-18T04:14:06+5:302021-09-18T04:14:06+5:30

प्रदीप भाकरे असाईनमेंट अमरावती : आजही हजारो महिला पुरुषांच्या घाणेरड्या मनोवृत्तीच्या, त्यांच्या मनातल्या विकृत वासनेच्या शिकार ठरत आहेत. ...

69 lust victims in eight months in the city | शहरात आठ महिन्यात ६९ महिला वासनेच्या शिकार

शहरात आठ महिन्यात ६९ महिला वासनेच्या शिकार

Next

प्रदीप भाकरे

असाईनमेंट

अमरावती : आजही हजारो महिला पुरुषांच्या घाणेरड्या मनोवृत्तीच्या, त्यांच्या मनातल्या विकृत वासनेच्या शिकार ठरत आहेत. कित्येक अल्पवयीन, तरुणींना पुरुषांच्या विकृतीमुळे आपले प्राण गमवावे लागत आहेत. आपली स्वप्नं मोडावी लागलीत. अनेक घरे, स्वप्ने उद्ध्वस्त होत आहेत. अलीकडे साकीनाक्यात घडलेला प्रकार आणि त्यानंतर पीडितेचा मृत्यू मन सुन्न करणारा आहे. ती घटना निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती ठरली आहे. मुंबईतच असे प्रकार होतात, असे नाही. कुठलेही शहर त्याला अपवाद नाही. फरक आहे. तो केवळ संख्यात्मक आकडेवारीचा. अमरावती शहर आयुक्तालयात जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान बलात्काराच्या ६९ घटनांची नोंद झाली.

समाजातील ही घाणेरडी वृत्ती दूर करायची असेल तर स्त्री कमकुवत नसून, मनोरंजनाचे साधन नसून, आपली इच्छा भागवणारी नसून ती एक शक्ती आहे. हे बाळकडूच त्यांना मिळायला हवे. हे सोपे किंवा सहज होणारे बदल नाहीत, हे मान्य असले तरी हे अशक्य नाही, असे आपण निश्चित म्हणू शकतो. सन २०१२ च्या डिसेंबरमधील निर्भया प्रकरण असो, की कालपरवाची साकीनाकाची घटना. या घटना विकृत वासनेच्या कळस ठरल्या आहेत.

///////////

गतवर्षीच्या तुलनेत घट

गतवर्षी जानेवारी ते डिसेंबरदरम्यान शहर आयुक्तालयातील १० पोलीस ठाण्यात बलात्काराची एकूण ८१ प्रकरणे दाखल करण्यात आली. त्यात ८० प्रकरणांतील आरोपींना अटक केलेली आहे. गतवर्षीच्या तुुलनेत या गुन्ह्यात १२ ची घट नोंदविण्यात आली आहे.

////////////

अल्पवयीन ठरतात शिकार

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींना पळवून नेणे, त्या स्थळी नेऊन त्यांच्यावर शारीरिक बळजबरी करणे, हे प्रकार सातत्याने घडत असतात. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात अशाच एका गुन्ह्यात एका तरुणाविरूद्ध अल्पवयीन मुलीला पळवून नेण्यासह बलात्कार व पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तर, अलीकडे एका पाच वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाची घृणास्पद घटना ग्रामीणमध्ये घडली होती.

///////////////

१०० टक्के गुन्ह्याची उकल

शहर आयुक्तालयात गतवर्षी ८१, तर यंदाच्या आठ महिन्यात बलात्काराच्या ६९ घटनांची नोंद झाली. त्यात गतवर्षी ८१ पैकी ८० तर, यंदा ६९ पैकी ६८ अशा संपूर्ण गुन्ह्यांची उकल करण्यात शहर पोलिसांना यश आले. सर्व प्रकरणातील आरोपी निष्पन्न झाले.

///////

वर्ष बलात्कार अपहरण

२०१८ : ७९ : ७५

२०१९ : ८० : ९५

२०२० : ८१ : ६१

२०२१ : ६९ : ६८

///////////////////////

Web Title: 69 lust victims in eight months in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.