शहरात वर्षभरात ७० लाखांच्या वीजचोरीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 10:07 PM2019-02-24T22:07:45+5:302019-02-24T22:10:13+5:30

शहरातील उपविभाग २ मध्ये महावितरणने वीजचोरीविरूद्ध मोहीन राबविली. यामध्ये वर्षभरात १५१ प्रकरणांत ६९ लक्ष ७२ हजारांची वीजचोरी उघड झाली. यापैकी ६४ ग्राहकांनी ३२ लक्ष ४० हजारांचा दंडासहीत भरणा केला असून उर्वरित प्रकरणांत पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

70 lakh electricity bills exposed in the city annually | शहरात वर्षभरात ७० लाखांच्या वीजचोरीचा पर्दाफाश

शहरात वर्षभरात ७० लाखांच्या वीजचोरीचा पर्दाफाश

Next
ठळक मुद्देमहावितरणची कारवाई : ३२ लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील उपविभाग २ मध्ये महावितरणने वीजचोरीविरूद्ध मोहीन राबविली. यामध्ये वर्षभरात १५१ प्रकरणांत ६९ लक्ष ७२ हजारांची वीजचोरी उघड झाली. यापैकी ६४ ग्राहकांनी ३२ लक्ष ४० हजारांचा दंडासहीत भरणा केला असून उर्वरित प्रकरणांत पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अमरावती शहरातील उपविभाग -२ मध्ये कॉटन मार्केट, राजकमल, जवाहर गेट, बुधवारा, कडबी बाजार व भाजीबाजार परिसराचा समावेश आहे. यापैकी भाजीबाजार, कडबी बाजार, बुधवारा या वितरण केंद्रांतर्गत परिसरांत वीजपुरवठा करणाऱ्या भाजीबाजार, लोनटेक, पाटीपुरा, न्यू ताज, महाजनपुरा, ईमामनगर, रोशननगर, चित्रा, ताज व नवसारी या ११ केव्ही विद्युत वाहिन्यांवर ५० टक्क्यांपेक्षा अधिक असलेली वीजहानी महावितरणसाठी चिंताजनक ठरत आहे. त्यामुळे या परिसरातील नियमित वीजबिल भरणाºया ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. या परिसरातील वीज वाहिनीवरील हानी कमी करण्यासाठी कबीरनगर, मांडवा झोपडपट्टी, मसानगंज, गवळीपुरा, पॅराडाईज कॉलनी, हबीबनगर, जमजमनगर, इमली प्लॉट, पठाण चौक, छायानगर, हाजरानगर, उस्माननगर, महाजनपुरा भागातील वीजचोरी रोखण्यासाठी वर्षभरात राबविलेल्या मोहिमेत ६९ लक्ष ७२ हजारांची वीजचोरी उघड झाली. वीजचोरी प्रकराणांमध्ये प्रामुख्याने वीज वाहिनीवर आकोडा टाकणे, डिस्ट्रिीब्युशन बॉक्समधून थेच व भूमिगत केबल टाकून वीजचोरी करणे, सर्विस वायरला टॅपिंग करणे, मीटरमध्ये खोडसाळपणा, असे जिवितास धोका उदभवणारे प्रकार आढळून आले आहेत. त्यामुळे धडक कारवाई दरम्यान ६४ ग्राहकांनी दंडासहीत ३२ लाख ४० रुपये भरले असून, उर्वरित वीजचोरांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
वीजचोरांची जाहीर बदनामी करणार
परिसरात अवैधरीत्या वीजचोरी करणाऱ्यांची नावे महावितरणच्या प्रत्येक वितरण केंद्राच्या दर्शनी भागात लावून त्यांची जाहीर बदनामी करण्यात येणार आहे. वीजचोरांना बाजूच्या घरातून कोणी अनधिकृत वीज देत असेल तर त्यांच्यावरही वीज कायदा २००३ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

प्रामाणिक वीजग्राहकांना सुरळीत सेवा देण्यास महावितरण आग्रही आहे. या वीज वाहिनीवरील वितरण हानी कमी करण्यासाठी व वसुलीसाठी मोहीम तीव्र करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाºयांना दिले आहे.
- सुचित्रा गुजर,
मुख्य अभियंता, महावितरण कंपनी

Web Title: 70 lakh electricity bills exposed in the city annually

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.