अमरावती जिल्ह्यातील 70 पोलीस अधिकाऱ्यांच्या होणार बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 04:01 PM2019-01-27T16:01:36+5:302019-01-27T16:04:37+5:30
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवलेल्या लोकसभा निवडणुकीबाबत ज्या पोलीस अधिकाऱ्यांना जिल्ह्यात किंवा एकाच ठाण्यात चार वर्षे पूर्ण झाले, त्यांच्या नावाची निवडणूक आयोगाने यादी मागवली आहे.
चेतन घोगरे
अमरावती - अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवलेल्या लोकसभा निवडणुकीबाबत ज्या पोलीस अधिकाऱ्यांना जिल्ह्यात किंवा एकाच ठाण्यात चार वर्षे पूर्ण झाले, त्यांच्या नावाची निवडणूक आयोगाने यादी मागवली आहे. जिल्ह्यातील 70 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात येत आहे.
एप्रिल 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. फेब्रुवारी महिन्यातच आचारसंहिता लागून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. तत्पूर्वी जिल्ह्यातील चार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे नियोजन पोलीस विभागाने केले आहे त्याची तयारी व त्या बाबतची यादी मागवण्यात आली आहे. निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक पोलीस अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील एक उपविभागीय पोलीस अधिकारी, पाच पोलीस निरीक्षक, 29 सहायक पोलीस निरीक्षक तसेच 35 पोलीस उपनिरीक्षकांच्या कार्यकारी पूर्ण झाला आहे. तर काहींचा गतवर्षीच कार्यकाळ पूर्ण झाला होता पण त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र लोकसभेच्या निवडणुकीमुळे त्यांची सुद्धा बदली होणार आहे त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार आहे. निवडणूक काळात अनुचित प्रकार घडू नये व सुव्यवस्था अबाधित राहावी याचेही पोलीस विभागाने नियोजन केले आहे. यानंतर काही दिवसातच काही ठाणेदारांचे खांदेपालट होण्याची शक्यता आहे.
पंधरा ठिकाणी नवीन ठाणेदार
ग्रामीण पोलीस विभागाअंतर्गत 31 पोलीस ठाणे येत असून, यापैकी 15 ठाणेदारासुद्धा चार वर्षांचा जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यांच्या बदल्या होणार असल्यामुळे त्यांच्या जागी नवीन ठाणेदारांची नियुक्ती होणार आहे.