७०० कोटीच्या घोटाळ्याचे आरोप बिनबुडाचे ( सुधारित बातमी)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:13 AM2021-04-17T04:13:03+5:302021-04-17T04:13:03+5:30
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप काही दिवसांपासून विरोधकांकडून होत आहे. ते तथ्यहीन असून, ...
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप काही दिवसांपासून विरोधकांकडून होत आहे. ते तथ्यहीन असून, आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून विरोधकांनी माजी संचालकांना बदनाम करण्याचा प्रयत्न याद्वारे चालविल्याचा आरोप बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख व माजी आमदार वींरेंद्र जगताप यांनी केला आहे.
उलट गत १० वर्षात कधी नव्हे एवढा नफा बॅकेला आमच्या संचालक मंडळाच्या कार्यकाळात झाला आहे.ज्या ७०० कोटी संदर्भात आरोपकेले जात आहे.ते सर्व पैसे बॅकेकडे सुरक्षित असून या ७०० कोटीवर २७३ कोटी ८६ लाख रूपयाचे व्याज बॅकेकडे जमा झाले आहे.माजी संचालक मंडळाने गुंतवणूकी संदर्भात धोरण ठरविले होते.त्यानुसार अधिकाऱ्यांनी ७०० कोटीची गुंतवणूक केली होती.त्या गुंतवणूकीवर ऑडिट देखील करण्यात आले.परंतु ऑडिटमध्ये कुठल्याही प्रकारचे ऑब्जेशन नाही.तसेच नाबार्डचे देखील याबाबत ऑब्जेशन नाही.काही विरोधकांनी नाहकच संचालक मंडळासह बॅकेची दखेली बदनामी करण्याचा प्रयत्न चालविल्याने अशा लोकांविरूध्द आम्ही कायदेशीर कारवाई करू असा इशारा माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिला आहे.एकेकाळी डबघाईच्या वाटेवर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बॅकेवर गत १० वर्षापूर्वी सहकार पॅनेलच्या नेतु्त्वात बॅकेचा कारभार आमच्या संचालक मंडळाने हाती घेतला.शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेत बॅकेमधील ठेवी २२०० कोटी पर्यत नेवून पोहविल्यात,शुभमंगल योजना,गृह योजना, सोने तारण कर्ज योजना,तसेच पगारी कर्मचाऱ्याना गृह कर्ज,वाहन कर्ज,वैयक्तीक कर्ज,शिक्षकांकरीता ओव्हर ड्रॉफ्ट वाहन कर्ज आदी सुविधा देत शेतकऱ्यासह बॅकेची देखील आर्थिक दुष्ट्या प्रगती केलेली आहे.हे दरवर्षी होणाऱ्या ऑडिटमध्ये आलेच आहे.त्यामुळे आज विदर्भात अमरावतीची सहकारी बॅकेचे नाव लौकीक आहे. बॅकेचा संपूर्ण व्यवहार संगणकीकृत झालेला आहे.या शिवाय आमच्या संचालक मंडळाने एटीएम सुविधा,आदिवासी भागासाठी मोबाईल व्हॅनची सुविधा असे कित्येक महत्वाचे निर्णय घेतले आहे.७०० कोटीचा घोटाळा झाल्याचा जो आरोप विरोधक करीत आहेत.तो पूर्णत: तथ्यहीन आहे.आमच्या कार्यकाळात बॅकेने सन २०१७ ते २०२१ या तिन वर्षात निप्पॉन म्युनिअल फंडात आरबीआयच्या नियमाप्रमाणे ७०० कोटीची गुंतवणूक केली होती.या गुंतवणूकी पोटी बॅकेला २७३ कोटी ८६ लाख रूपयाचा फायदा बॅकेला झालेला आहे.व त्याचे ऑडिट देखील झाले आहे.ऑडिट मध्ये कुठल्याही प्रकारचा आक्षेप नोंदविला नाही.असे असतांना विरोधकांकडून होत असलेले आरोप बिनबुडाचे असून आगामी निवडणूका लक्षात घेता विरोधकांचे हे षडयंत्र असून या मागे राजकीय किनार असल्याचे जगताप म्हणालेत. दरम्यान बॅकेच्या बदनामी केल्याबाबत प्रशासकांचे वतीने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.तर आम्हाला देखील बदनाम करणाऱ्या विरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करणार असल्याचे बबलू देशमुख यांनी सांगितले.यावेळी पत्रपरिषदेला प्रकाश काळबांडे,दयाराम काळे,अनंत साबळे, संजय वानखडे, रवींद्र गायगोले, प्रविण काशिकर,सुभाष पावडे,प्रदिप निमकर,बाळासाहेब अलोणे ,नितीन हिवसे आदी उपस्थित होते.