७२ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 10:06 PM2017-10-16T22:06:49+5:302017-10-16T22:07:17+5:30

72 percent voting | ७२ टक्के मतदान

७२ टक्के मतदान

Next
ठळक मुद्देग्रामपंचायत निवडणूक : उशिरापर्यंत केंद्रांमध्ये गर्दी, थेट सरपंचांमुळे चुरस

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील २५० ग्रामपंचायतींसाठी सोमवारी मतदान झाले. प्रथमच थेट सरपंच निवडून येणार असल्याने मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. जिल्ह्यात सरासरी ७२ टक्के मतदान झाले. यादरम्यान तुरळक घटना वगळता कुठेही अप्रिय घटना घडल्याची नोंद नाही.
सरपंच व सदस्यपदांसाठी रिंगणात असलेल्या ४२८१ उमेदवारांचे भाग्य सोमवारी ईव्हीएममध्ये बंद झाले. यात सरपंचपदाचे ९८२, तर सदस्य पदांसाठी ३२९९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मंगळवारी सकाळी १० वाजतापासून संबधित तहसील कार्यालयात मतमोजणी सुरू होणार आहे.
जिल्ह्यातील २५० ग्रामपंचायतींच्या ७९२ प्रभागातील १४६१ सदस्य व २४९ सरपंचपदासाठी सोमवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान मतदान झाले. काही केंद्रांवर निर्धारित वेळेपर्यंत मतदान पूर्ण न झाल्याने मतदान केंद्रात उशिरापर्यंत मतदारांची गर्दी होती. या निवडणुकीसाठी १ लाख ६६ हजार १६५ पुरुष व १ लाख ५० हजार ८८२ स्त्री व इतर चार असे एकूण ३ लाख १७ हजार ५१ मतदार होते. सकाळी ७.३० ते दुपारी १.३० या कालावधीत ६२ हजार ८२८ स्त्री, ७० हजार ३२८ पुरुष असे एकूण १ लाख ३३ हजार १५६ मतदारांनी मतदान केले. ही ४२ टक्केवारी होती.मतदारांचा ओघ वाढल्याने दुपारी ३.३० पर्यंत ९२,१६० स्त्री व ९७,४०७ पुरुष असे एकूण १ लाख ८९ हजार ५६७ मतदारांनी मतदान केले. ही टक्केवारी ५९.७९ अशी होती. मतदानाची निर्धारित वेळ सायंकाळी ५.३० पर्यंत असताना केंद्रांवर मतदारांची गर्दी असल्याने उशिरापर्यंत मतदान सुरू होते.
अचलपूर तालुक्यात २३ ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतदानात सरासरी ८१ टक्के मतदान झाल्याचे संबधित अधिकाºयांनी सांगितले. धामणगाव रेल्वे तालुक्यात ८ ग्रामपंचायतीत झालेल्या मतदानाची टक्केवारी ८६.०३ टक्के होती. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी ७५ टक्के, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १७ पैकी १६ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची टक्केवारी ७९.०१ टक्के , दर्यापूर तालुक्यातील २० ग्रामपंचायतींसाठी ८६ टक्के मतदान झाले. वरूड तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींसाठी ८०.८१ टक्के, मोर्शी तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी अंदाजे ७६ टक्के, तिवसा तालक्यातील १२ ग्रामपंचायतींसाठी ८४ टक्के, चांदूर बाजार तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींसाठी ८१.१० टक्के, चांदूर रेल्वे तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींसाठी ७६ टक्के, अमरावती तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींसाठी ७५ टक्के, भातकुली तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींसाठी ७८ टक्के , धारणी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींसाठी ७२ टक्के मतदान झाले. चिखलदरा तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या मतदानाची आकडेवारी मिळाली नाही.
६.३० पर्यंत मतदान प्रक्रिया
चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा व घाटलाडकी येथे सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. ५.३० वाजता केंद्राचे दरवाजे बंद करुन मतदान झाले.

Web Title: 72 percent voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.