Amravati Graduates constituency : अमरावती पदवीधरमध्ये टपाली 73 मते बाद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 12:11 PM2023-02-02T12:11:10+5:302023-02-02T12:17:07+5:30

या निवडणुकीसाठी एकूण 265 टपाली मते प्राप्त झाली होती

73 postal ballots given to employees on election duty were rejected in the counting | Amravati Graduates constituency : अमरावती पदवीधरमध्ये टपाली 73 मते बाद

Amravati Graduates constituency : अमरावती पदवीधरमध्ये टपाली 73 मते बाद

Next

गजानन मोहोड

अमरावती : निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या 73 टपाली मतपत्रिका मतमोजणीत बाद झाल्या. या कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेसोबत घोषणापत्र न दिल्याने ही मते बाद ठरली आहेत.

या निवडणुकीसाठी एकूण 265 टपाली मते प्राप्त झाली होती. त्यापैकी वैध 192 मतांची मोजणी करण्यात येणार आहे. बाद झालेल्या टपाली मतपत्रिकेमध्ये अकोला जिल्ह्यात सर्वाधिक 34, अमरावती 19, यवतमाळ 7, बुलढाणा 12, वाशिम जिल्ह्यातील एका टपाली मतपत्रिकेचा समावेश आहे. दरम्यान मतपत्रिकांचे प्रत्येकी 25 या प्रमाणात गठ्ठे तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे दुपारी एक नंतरच मतमोजणीला सुरुवात होईल असे चित्र आहे.

Web Title: 73 postal ballots given to employees on election duty were rejected in the counting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.