पाणीटंचाई निवारणार्थ ७३६ उपाययोजना

By admin | Published: March 26, 2016 12:11 AM2016-03-26T00:11:46+5:302016-03-26T00:11:46+5:30

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाव्दारा ७०८ गावांत पाणीटंचाई निवारणार्थ ७३६ उपाययोजना सुरू आहेत.

736 measures for the prevention of water shortage | पाणीटंचाई निवारणार्थ ७३६ उपाययोजना

पाणीटंचाई निवारणार्थ ७३६ उपाययोजना

Next

दाहकता वाढली : १० कोटी ९१ लाखांची तरतूद
अमरावती : ग्रामीण पाणीपुरवठा विभागाव्दारा ७०८ गावांत पाणीटंचाई निवारणार्थ ७३६ उपाययोजना सुरू आहेत. यावर १० कोटी ९१ लाख ९० हजारांचा खर्च होणार आहे. यामध्ये ४७ गावांत ५० उपाययोजनांना मंजुरी मिळाली. यावर ८१ लाख ५० हजारांचा खर्च होणार आहे.
पाणीटंचाईच्या कृती आराखड्यानुसार ३०७ विंधन विहिरी, कुपनलिका घेण्यात येणार आहेत. यावर २ कोटी ६६ लाख ६० हजार रुपयांचा निधी खर्च होईल. १९१ नळयोजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी ४ कोटी ७९ लाख ८० हजारांचा खर्च होणार आहे. ५३ तात्पुरत्या पूरक नळयोजना घेण्यात येणार असून यावर २ कोटी ४३ लाख ५० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. १५ टँक्टरने पाणीपुरवठा प्रस्तावित आहे. यावर २१ लाख ३० हजारांचा खर्च होणार असून १७० खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येईल. आराखड्यात ४७ गावांतील ५० उपाययोजनांना मंजुरी मिळाली असून यावर ८१ लाख ५० हजारांचा खर्च होणार आहे. तूर्तास २२ उपाययोजना सुरू आहेत. यावर १६ लाखांचा निधी खर्च होणार आहे.

आठ गावांत नळयोजनांची विशेष दुरुस्ती
जिल्ह्यात सद्यस्थितीत आठ गावांत तात्पुरत्या नळयोजनांना मंजुरी देण्यात आलेली आहे. यावर ४७ लाख ५३ हजारांचा निधी खर्च होणार आहे. यामध्ये सुलतानपूर १ लाख ४१ हजार, बेनोडा ९ लाख ९९ हजार, परसापूर २ लाख ९९ हजार, दर्याबाद ३ लाख १४ हजार, शिंदी बु. ६ लाख, सर्फाबाद ४ लाख ४४ हजार, येरला ९ लाख ४५ हजार व लेहेगाव येथे ९ लाख ९९ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: 736 measures for the prevention of water shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.