हेरिटेज सायकल रॅलीत ७५ सायकलपटूंचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:14 AM2021-09-27T04:14:08+5:302021-09-27T04:14:08+5:30

अमरावती : भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे व जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन संचालनालयातर्फे आयोजित हेरिटेज सायकल रॅलीत ७५ ...

75 cyclists participate in Heritage Cycle Rally | हेरिटेज सायकल रॅलीत ७५ सायकलपटूंचा सहभाग

हेरिटेज सायकल रॅलीत ७५ सायकलपटूंचा सहभाग

Next

अमरावती : भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे व जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन संचालनालयातर्फे आयोजित हेरिटेज सायकल रॅलीत ७५ सायकलस्वार उत्साहात सहभागी होऊन तब्बल ६० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. वेलकम पॉईंटपासून सुरू झालेल्या रॅलीचा प्रवास यावली शहीदपर्यंत व परत अमरावतीकडे होऊन श्री शिवाजी महाविद्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला.

पर्यटन संचालनालयाचे अमरावती प्रादेशिक कार्यालय, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय तसेच अमरावती टूर्स अँड ट्रॅव्हल्स असोसिएशन, मैत्री संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हेरिटेज सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विभागीय उपायुक्त संजय पवार, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, क्रीडा उपसंचालक विजय संतान, पर्यटन उपसंचालक विवेकानंद काळकर, महापालिका सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, टूर्स एंड ट्रॅव्हल्स असोसिएशनचे विश्वनाथ अरोरा, नीलेश कोल्हे, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, मैत्री संस्थेचे सदस्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वेलकम पॉईंटपासून सकाळी सातच्या सुमारास रॅलीचा प्रारंभ झाला. उपायुक्त पवार यांच्यासह अनेक मान्यवर रॅलीत उत्साहाने सहभागी झाले.

////////

बॉक्स १

अशी झाली सायकल रॅली

स्थानिक वेलकम पॉईंटपासून यावली शहीद ते परत अमरावती असा ६० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यात आला. स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान असलेल्या यावली शहीदपर्यंत जाऊन पुन्हा अमरावतीत रॅली आली. श्री शिवाजी महाविद्यालयात सकाळी ११.३० सुमारास रॅलीचा समारोप करण्यात आला. कोविडला प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने मास्क, सुरक्षित सामाजिक अंतर आणि सॅनिटायझर या त्रिसूत्रीचे पालन रॅलीत करण्यात आले. मैत्री संस्थेतर्फे सहभागीसाठी ज्यूसची व्यवस्था करण्यात आली.

Web Title: 75 cyclists participate in Heritage Cycle Rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.