बाईकवर ७५ तिरंगा राष्ट्रीय ध्वज उभारून वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:17 AM2021-08-18T04:17:43+5:302021-08-18T04:17:43+5:30
पक्षिमित्र अरुण शेवाणे यांचा नावीन्यपूर्ण उपक्रम अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील कापूसतळणी येथील अरुण शेवाणे यांनी पंचवीस वर्षाआधी सुरू ...
पक्षिमित्र अरुण शेवाणे यांचा नावीन्यपूर्ण उपक्रम
अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील कापूसतळणी येथील अरुण शेवाणे यांनी पंचवीस वर्षाआधी सुरू केलेला १५ ऑगस्टला सायकलवर व बाईकवर तिरंगा लावून शहिदांना सलामी देण्याचा उपक्रम आजही सुरू आहे. यंदा स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनी त्यांनी बाईकवर ७५ राष्ट्रधवज लावले होते. याकरिता ९० किलो सळाखीचा मनोरा त्यांनी उभारला होता.
सजावटीकरिता सुरेश महानकर, प्रशांत सरदार, प्रदीप सातवटे, चेतन बाबनेकर, प्रतीक मळसणे, संजय हिंगे, महादेव वानखडे आदींनी परिश्रम घेतले. एकूण २२ हजारांचा खर्च त्याकरिता आल्याचे अरुण शेवाणे यांनी सांगितले. जनजागृती रॅली सुरू असताना मोठ्या प्रमाणात तरुणांनी बाईकसोबत सेल्फी घेतली. तरुणांना राष्ट्रीय अस्मिता, राष्ट्रध्वजाकडे आकर्षित करण्याचा हा उपक्रम सहकाऱ्यांनी यशस्वी केल्याचे ते म्हणाले. किमान तरुणांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी स्वतःच्या बाईकवर तिरंगा लावून शहिदांना सलामी देत त्यांच्या आठवणी अमर ठेवाव्यात तसेच या उपक्रमाची नोंद गिनीज बुकात व्हावी, अशी अपेक्षा याप्रसंगी भेट देणाऱ्या मान्यवरांनी केली.