जिल्हा परिषद : सेवा प्रवेशोत्तर परीक्षेत ७७ टक्के अधिकारी-कर्मचारी नापास

By जितेंद्र दखने | Published: August 22, 2023 06:50 PM2023-08-22T18:50:31+5:302023-08-22T18:50:40+5:30

१२० पैकी ८४ अनुत्तीर्ण, २८ जण उत्तीर्ण

77 percent officers-employees failed in the post-entry examination | जिल्हा परिषद : सेवा प्रवेशोत्तर परीक्षेत ७७ टक्के अधिकारी-कर्मचारी नापास

जिल्हा परिषद : सेवा प्रवेशोत्तर परीक्षेत ७७ टक्के अधिकारी-कर्मचारी नापास

googlenewsNext

अमरावती : राज्याच्या ग्रामविकास विभागामार्फत दरवर्षी डिसेंबर महिन्यात जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची सेवा प्रवेशोत्तर परीक्षा घेतली जाते. यंदा ही परीक्षा २५ व २६ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांच्या मार्गदर्शनात राज्यात पहिल्यांदा अमरावतीचा निकाल २१ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला. तो २३.३३ टक्के लागला आहे, तर ७७ टक्के अधिकारी-कर्मचारी अनुत्तीर्ण झाले आहेत.

सेवा प्रवेशोत्तर परीक्षेला जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहायक, वरिष्ठ सहायक, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी शिक्षण, सांख्यिकी, कृषी, आरोग्य याप्रमाणे अधिकारी व कर्मचारी मिळून १२० जणांनी परीक्षा दिली होती. यापैकी केवळ २८ अधिकारी व कर्मचारी उत्तीर्ण झाले, तर ८४ जण अनुत्तीर्ण झाले. परीक्षेला आठ कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. या परीक्षेचा तपशीलवार निकाल विभागीय आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची दरवर्षी डिसेंबर महिन्यात सेवा प्रवेशोत्तर परीक्षा घेतली जाते. यंदा ही परीक्षा गत फेब्रुवारी महिन्यात पार पडली. या परीक्षेचा निकाल राज्यात अमरावती विभागीय आयुक्तांनी पहिल्यांदा जाहीर केला आहे.- पंकज गुल्हाने, राज्य उपाध्यक्ष, जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटना

Web Title: 77 percent officers-employees failed in the post-entry examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.