जिल्हा स्त्री रुग्णालयात ११ महिन्यांत ७७४८ प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:14 AM2020-12-31T04:14:41+5:302020-12-31T04:14:41+5:30

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात जानेवारी ते नोव्हेंबर २०२० दरम्यान ११ महिन्यांत ७७४८ बाळांचा जन्म झाला. यात कोरोना काळात ...

7748 deliveries in 11 months in District Women's Hospital | जिल्हा स्त्री रुग्णालयात ११ महिन्यांत ७७४८ प्रसूती

जिल्हा स्त्री रुग्णालयात ११ महिन्यांत ७७४८ प्रसूती

Next

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात जानेवारी ते नोव्हेंबर २०२० दरम्यान ११ महिन्यांत ७७४८ बाळांचा जन्म झाला. यात कोरोना काळात जन्मलेल्या ६२५२ बाळांचा समावेश आहे.

कोविड-१९ विषाणूचे भारतात मार्च महिन्यात आगमन झाले. त्याच्या प्रतिबंधासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्यात. आरोग्य जपणे हे प्रत्येक नागरिकांसमोर आव्हान उभे ठाकले होते. अशाही परिस्थितीत स्तनदा मातांनी आपल्या आरोग्याची नीट काळजी घेऊन होणाऱ्या बाळाला कोरोनाची चुणुकही न लागू देता सुखरूप जन्म दिला आहे. यात ३१७० महिलांचे सिझेरियन झाले असून त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय सूत्राकडून मिळाली.

चालू वर्षातील जन्माची आकडेवारी

महिना जन्म सिझेरियन मुले मुली

जानेवारी ७७९ ३२३ ४११ ३५०

फेब्रुवारी ६७५ २९८ ३५१ ३५६

मार्च ६७५ २८७ ३३१ ३२९

एप्रिल ६६२ २८० ३४८ ३०१

मे ६०० २७२ ३०१ २७६

जून ६०३ २६४ ३०४ २८९

जुलै ६०५ २४९ ३०३ २८३

ऑगस्ट ७१९ २६९ ३५९ ३४३

सप्टेंबर ८०५ २८६ ३७७ ३८८

ऑक्टोबर ८४२ ३४१ ४३१ ३९२

नोव्हेंबर ७४१ ३०१ ३६९ ३६२

एकूण ७७४८ ३१७० ३८८५ ३६६९

----------------------------

जिल्हा स्त्री रुग्णालयात कोरोना काळात दररोज रुग्ण येत होत्या. प्रसूती नियमित झाल्यात. कोरोना काळात स्तनदा मातांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला आम्ही दिला आणि देत आहोत.

- विद्या वाठोडकर,

अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय

Web Title: 7748 deliveries in 11 months in District Women's Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.