७.८५ कोटींची ग्रामपंचायतीची पाणीपट्टी थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:13 AM2021-02-07T04:13:01+5:302021-02-07T04:13:01+5:30
अमरावती : जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींचे सन २०१९-२० मधील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या पाणीपट्टीची अद्यापही ७ कोटी ८५ लाख रुपयांची पाणीपट्टी ...
अमरावती : जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींचे सन २०१९-२० मधील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या पाणीपट्टीची अद्यापही ७ कोटी ८५ लाख रुपयांची पाणीपट्टी वसुली थकीत आहे. येत्या मार्च महिन्याअखेरपर्यत ती रक्कम वसुलीचे आव्हान ग्रामपंचायतीसमोर उभे ठाकले आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रातील मालमत्ता कर वगळता पाणीपट्टी कराची वसुली ६६.९० टक्केच झाली आहे. विशेष म्हणजे कर वसुलीसाठी आलेल्या पथकाला कोरोनाची कारणे सांगण्यात येत आहेत. परंतु ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे कर वसुलीची टक्केवारी पुढे सरकली आहे. मात्र, अजूनही बरीच कर वसुली थकीत असल्याने याचा परिणाम ग्रामपंचायत क्षेत्रातील उपयायोजनेच्या कामांवर होत आहे. अशातच सन २०२९-२० या आर्थिक वर्षातील जिल्हा परिषद पंचायत विभागाकडून प्राप्त झालेल्या पाणीपट्टी मागणी वसुली अहवालानुसार १४ पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील ८४० ग्रामपंचायतीकडे पाणीपट्टीची सुमारे २३ कोटी ७३ लाख रूपयाची वसुली होती. त्यापैकी आतापर्यंत १५ कोटी ८८ लाख रुपयांची वसुली झालेली आहे. अजूनही ७ कोटी ८५ लाख रुपये थकीत कर वसुलीचे आव्हान ग्रामपंचायतीसमोर उभे ठाकले आहे. मात्र मार्चपर्यंत ही करवसुली होणार की नाही, याबाबतचे अंतिम चित्र मार्च महिन्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
बॉक्स
पं. स.निहाय ग्रा.पं.थकीत रक्कम
अमरावती १.७८ ,भातकुली ३२.०६ ,नांदगाव खंडेश्र्वर ९१.०१,चांदूर रेल्वे ८७.०६,धामनगांव रेल्वे १.२६,तिवसा१.४५, मोर्शी १.४३, वरूड २.३४,चांदूर बाजार ३.१९, अचलपूर १.४८, दर्यापूर अंजनगाव निरंक, चिखलदरा ११.०४ आणि धारणी ५६ लाख अशी एकूण ७ कोटी ८५ लाख रूपयाची पाणी पट्टी थकीत आहे.