दर्यापूर तालुक्यातील ७९ गावे कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:10 AM2021-06-05T04:10:44+5:302021-06-05T04:10:44+5:30
सचिन मानकर दर्यापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यात २ जूनपर्यंत १,८२३ रुग्णांची नोंद झाली, तर ३८ जणांना प्राणास ...
सचिन मानकर
दर्यापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यात २ जूनपर्यंत १,८२३ रुग्णांची नोंद झाली, तर ३८ जणांना प्राणास मुकावे लागले. नगरपालिका हद्दीत ३९८ रुग्णांची नोंद झाली. गावांमध्ये १,४२५ रुग्ण आढळले. तूर्तास तालुक्यातील १३३ गावांपैकी ७९ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. अजूनही ५४ गावांत कोरोना रुग्ण असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
तालुक्यात १ मार्च ते २ जून दरम्यान १८,७३४ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १,८२३ जण पॉझिटिव्ह आले. या काळात आरोग्य विभाग, महसूल, नगरपालिका पोलीस प्रशासन, पंचायत समिती या कोरोना योद्ध्यांनी आपापली जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडल्याने कोरोनाची ही दुसरी लाट नियंत्रणात आली. मे महिन्यात तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांत मोठी वाढ पहायला मिळाली. ग्रामीण भागात, तर कोरोनाने थैमान घातले होते.
बॉक्स
कोरोना हॉटस्पॉट गावे
तालुक्यातील अंतरगाव इटकी, येवदा, साईनगर (गायवाडी) रामगाव, बेलोरा, आमला, सामदा, म्हैसपूर, खल्लार या गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले.
ॲक्टिव्ह रुग्ण
तालुक्यातील ग्रामीण भागात २ जूनपर्यंत २९३, तर शहरात ५४ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. यात २५७ जणांना कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले. शहरातील रुग्णालयात दाखल असलेले ४९ रुग्ण आहेत. इतर ठिकाणी असलेल्या रुग्णालयात ४१ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.
कोट
नागरिकांनी सतर्कता बाळगावी. लक्षणे आढळल्यास तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे. कोरोनाची चाचणी करून घ्यावी. तालुक्यातील नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. यामुळे कोरोनाची तीव्रता कमी होण्यास मदत मिळते.
- डॉ. संजय पाटील,
तालुका आरोग्य अधिकारी, दर्यापूर