अचलपूर तालुक्यात ८0 बालके कुपोषित
By admin | Published: June 3, 2014 11:45 PM2014-06-03T23:45:36+5:302014-06-03T23:45:36+5:30
बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कुपोषण निर्मूलन कार्यक्रम हाती घेतला आहे. परंतु अधिकार्यांच्या दुर्लक्षितपणामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढतेच आहे. जानेवारी २0१४ मध्ये करण्यात
सुनील देशपांडे - अचलपूर
बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कुपोषण निर्मूलन कार्यक्रम हाती घेतला आहे. परंतु अधिकार्यांच्या दुर्लक्षितपणामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढतेच आहे. जानेवारी २0१४ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात अचलपूर तालुक्यातील ८0 बालके कुपोषित असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. त्यातील ४ बालकांना दुर्धर आजाराने ग्रासले असून ११ बालके सॅम म्हणजेच अति कुपोषणाच्या वर्गवारीतील आहेत. यातील पथ्रोट प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४0 बालके कुपोषित आहेत.
गरोदर मातांना वेळेवर योग्य लस न मिळणे, मातेची उंची व वजन कमी असणे, बाळ जन्मल्यानंतर त्याचे वजन दोन किलोच्या आत असणे, अंगणवाडीतून मिळणारा आहार नियमित व प्रोटीनयुक्त न मिळणे या प्रमुख कारणांसह आदी कारणांमुळे बालके कुपोषित होतात. संबंधित अधिकार्यांच्या उदासिनतेने या बाबींकडे लक्ष पुरविले जात नसल्याने अचलपूर तालुक्यात कुपोषण होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तालुक्यातील तीन आरोग्य केंद्रांतर्गत ८ बालके कुपोषित आहेत. यात धामणगाव गढी ३७, येसुर्णा १३ व पथ्रोट केंद्रांतर्गत ४0 बालके कुपोषित आहेत, अशी स्थिती जानेवारी महिन्यात एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयामार्फत केलेल्या सर्वेक्षणात पुढे आली आहे.
बालविकास प्रकल्प कार्यालयातून देण्यात येणारी सुकळी, शिरा, उपमा हा सकस आहार गरोदर माता खाण्यास तयार होत नाही. त्यामुळे त्याची पाकिटे काही केंदामधून विकली जातात. गर्भवती महिलेला दोन महिन्यात १२ पाकिटे मिळतात. ही विकलेली पाकिटे सरळ जनावरांपुढे ठेवली जातात. तसेच इंदिरा गांधी मातृत्व सेवा योजने अंतर्गत मातेला चार हजार रुपये दिले जातात. बाळ जन्मल्यावर त्यानंतर चार महिन्याने व शेवटी सहा महिन्याने हे पैसे किती मातांना मिळाले हा शोधाचा विषय आहे. जननी सुरक्षा योजनेत मातांना मिळणार्या सुरक्षेतेची संबंधित अधिकारी व कर्मचारी योग्य काळजी घेत नसल्याने बालके कुपोषित जन्माला येतात, अशी माहिती अंगणवाडी सेविकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.