एसटी महामंडळाला दोन दिवसात ८० लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:15 AM2021-08-29T04:15:54+5:302021-08-29T04:15:54+5:30
अमरावती : यंदा स्वातंत्र्यदिन म्हणजेच १५ ऑगस्टपासून शासनाने सर्वत्र अनलॉक केले. एस.टी. महामंडळातर्फे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर पूर्ण क्षमतेने बसेस सोडल्यामुळे ...
अमरावती : यंदा स्वातंत्र्यदिन म्हणजेच १५ ऑगस्टपासून शासनाने सर्वत्र अनलॉक केले. एस.टी. महामंडळातर्फे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर पूर्ण क्षमतेने बसेस सोडल्यामुळे अमरावती विभागाने २३ व २४ ऑगस्ट या दोन दिवसात प्रत्येकी ४० लाख याप्रमाणे ८० लाखांचे उत्पन्न मिळविले. कोरोना संसर्गामुळे मध्यंतरी एसटी बसेसही बंद होत्या. परिणामी एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती डबघाईस आली. परंतु कोविड-१९ चा संसर्ग कमी झाल्यामुळे अनलॉक होताच एसटी महामंडळाने पूर्ण क्षमतेने बसेस सोडणे सुरू केले आहे. अशातच सणासुदीचा कालावधी असल्याने सुरुवातीपेक्षा आता प्रवाशांचा एसटी बसेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळेच महामंडळाच्या तिजोरीत लाखोचे उत्पन्न येण्यास सुरुवात झाली आहे.
१५ ऑगस्टनंतर रक्षाबंधन हा पहिलाच सण आल्यामुळे जिल्ह्यातील अमरावती, बडनेरा, दर्यापूर, परतवाडा, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे या एस.टी. आगारातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळणाऱ्या मार्गावर बसेस सोडण्यात आल्या होत्या. रक्षाबंधनाच्या २१ ते २४ ऑगस्ट या कालावधीत अमरावती विभागाने दोन दिवसात ८० लाखांचे उत्पन्न मिळविले आहे.
कोट
रक्षाबंधनात सर्व मार्गावर जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले होेते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या कालावधीत २३ व २४ या दोन दिवसात विभागाने ८० लाखांचे उत्पन्न मिळविले आहे.
- श्रीकांत गभणे,
विभाग नियंत्रक