८२ प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’

By Admin | Published: September 29, 2016 12:23 AM2016-09-29T00:23:32+5:302016-09-29T00:23:32+5:30

जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा ११९ टक्के झालेला पाऊस व पंधरवड्यापासून सुरू असलेला परतीचा पाऊस ..

82 projects 'Overflow' | ८२ प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’

८२ प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’

googlenewsNext

दिलासा : सरासरी ९६ टक्के जलसाठा 
अमरावती : जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा ११९ टक्के झालेला पाऊस व पंधरवड्यापासून सुरू असलेला परतीचा पाऊस यामुळे जिल्ह्यातील मुख्य, मध्यम व लघु असे एकूण ८२ प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ झालेले आहेत. यासर्व प्रकल्पांत सरासरी ९५.१४ जलसाठा आहे.
जिल्ह्यातील एकमेव मुख्य प्रकल्प उर्ध्व वर्धा प्रकल्पात संकल्पित ५६४.०५ दलघमी जलसाठ्याच्या तुलनेत तेवढाच जलसाठा आहे. ही टक्केवारी १०० आहे. जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी शहानूर प्रकल्पात संकल्पित ४६.०४ दलघमी जलसाठ्याच्या तुलनेत सद्यस्थितीत ४३.१२ दलघमी जलसाठा आहे. ही ९३.६६ टक्केवारी आहे.चंद्रभागा प्रकल्पात संकल्पित ४१.२५ दलघमी जलसाठ्याच्या तुलनेत ४०.६१ दलघमी जलसाठा आहे. ही ९८.४५ टक्केवारी आहे. पूर्णा प्रकल्पात संकल्पित ३५.३७ दलघमी पाण्याच्या तुलनेत ३३.३६ दलघमी जलसाठा आहे. ही ९४.३२ टक्केवारी आहे. प्रकल्पात संकल्पित ३८.६० दलघमी साठ्याच्या तुलनेत सद्यस्थितीत ३६.८७ दलघमी जलसाठा आहे. ही ९५.५२ टक्केवारी आहे. जिल्ह्यात एकूण ७७ लघुप्रकल्प आहेत. या प्रकल्पांची सरासरी संकल्पित पातळी १७९.८४ दलघमी साठ्याच्या तुलनेत सद्यस्थितीत १४३.१७ दलघमी जलसाठा आहे. ही ९५.४७ टक्केवारी आहे. यासर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने परतीचा पाऊस होत असल्याने प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ झालेले आहेत. धरण प्रशासनाने सुरक्षिततेचा उपाय म्हणून धरणातून अल्पसा विसर्ग सुरू केला आहे. (प्रतिनिधी)

तीन धरणांचे दरवाजे उघडले
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्यापासून परतीचा पाऊस होत असल्याने थोड्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. यामध्ये उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे ५ गेट १५ से.मी. ने उघडण्यात येऊन १२३ घमीप्रसे विसर्ग सुरू आहे. चंद्रभागा प्रकल्पाचे २ गेट ५ सेमीने उघडण्यात येऊन १२ घमीप्रसे विसर्ग सुरू आहे. पूर्णा प्रकल्पाची २ गेट ५ से.मी. ने उघडण्यात येऊन ८.९२ घमीप्रसे विसर्ग सुरू आहे.

सरासरीत चिखलदरा शेवटच्या स्थानी
जिल्ह्यात १ जून ते २६ सप्टेंबर या कालावधीत ७९१.५ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ९२६.७ मिमी पाऊस पडला. ही ११८.९ टक्केवारी आहे तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत ११५.५ मिमी हा पाऊस सर्वाधिक १६३ टक्के पाऊस चांदूरबाजार तालुक्यात पडला तर सर्वात कमी ९६.१ टक्के चिखलदरा तालुक्यात पडला.

Web Title: 82 projects 'Overflow'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.