केरळच्या पूरग्रस्तांसाठी ८२ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 09:40 PM2018-08-24T21:40:15+5:302018-08-24T21:40:32+5:30
येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मनोज निचत व डॉ. किरण निचत या दाम्पत्याने ७१ हजार, तर त्यांच्या श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये काम करणाºया कर्मचाºयांनी ११ हजार असा एकूण ८२ हजारांचा धनादेश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे सुपूर्द केली. ही मदत केरळ येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात आली असून, केरळ मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या नावाने सदर धनादेश देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मनोज निचत व डॉ. किरण निचत या दाम्पत्याने ७१ हजार, तर त्यांच्या श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये काम करणाºया कर्मचाºयांनी ११ हजार असा एकूण ८२ हजारांचा धनादेश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे सुपूर्द केली. ही मदत केरळ येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात आली असून, केरळ मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या नावाने सदर धनादेश देण्यात आला आहे.
डॉ. मनोज निचत हे सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांनी यापूर्वीसुद्धा भूकंपग्रस्तांना मदत म्हणून धनादेश दिला होता. डॉ. निचत यांनी जिल्हाधिकाºयांची मंगळवारी भेट घेऊन सदर धनादेश दिले व कर्मचाºयांनी स्वयंस्फूर्तीने समोर येऊन ११ हजार हजारांचा निधी गोळा केल्याबद्दल जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी त्यांचे कौतुक केले. मदतीबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. कर्मचाºयांनी निधी गोळा करणे ही फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे त्यांचेही जिल्हाधिकाºयांनी कौतुक केले. श्रीकृष्ण हॉस्पिटलचे कर्मचारी तसेच कृ ष्णप्रेमी मेडिकलचे संचालक शैलेश बहादुरे, बबनराव वैराळे यांनी ११ हजारांचा धनादेश जिल्हाधिकाºयांना दिला.