आठ कोटींच्या विम्यात ८३ कोटींची भरपाई

By admin | Published: June 20, 2015 12:50 AM2015-06-20T00:50:28+5:302015-06-20T00:50:28+5:30

राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात खरीप २०१४-१५ पीकविमा योजना राबविण्यात आली होती.

83 crores compensation in eight crores insurance | आठ कोटींच्या विम्यात ८३ कोटींची भरपाई

आठ कोटींच्या विम्यात ८३ कोटींची भरपाई

Next

खरीप २०१४ योजना : १ लाख १६ हजार १३० शेतकऱ्यांना होणार लाभ
अमरावती : राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात खरीप २०१४-१५ पीकविमा योजना राबविण्यात आली होती. खरिपात पावसाअभावी दुष्काळ स्थिती, पैसेवारी ५० पैशाच्या आत व उंबरठा उत्पन्न आदींच्या आधारे १ लाख १६ हजार १३० शेतकऱ्यांच्या १ लाख १२ हजार ७८२ हेक्टर क्षेत्रासाठी ८३ कोटी ९२ लाख ८८ हजार ४७९ रुपयांचा लाभ होणार आहे. शेतकऱ्यांनी ८ कोटी ६ लाख ४२ हजार ८३८ रुपयांचा विमा हप्त्याचा भरणा केला होता.
खरिपाच्या पिकाचे पूर चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट या आपत्तीपासून संरक्षण मिळावे यासाठी भरपाई वैयक्तिक स्तरावर निश्चित करुन संरक्षण मिळण्याकरिता ही योजना जिल्ह्यात राबविण्यात आली. या योजनेत जिल्ह्यातील १ लाख २१ हजार ५६३ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला व १ लाख १२ हजार ७८२ हेक्टर १३२ आर. पीक क्षेत्राचा समावेश होता. गुरुवारी विमा संरक्षित रक्कम निश्चित झाल्याचे विमा कंपनीचे पत्र कृषी विभागाला प्राप्त झाले आहे.
यानुसार अचलपूर तालुक्यात ४ कोटी ६८ लाख १ हजार ८०८ रुपये, अमरावती तालुक्याला ६ कोटी ९० लाख ९९३ रुपये, अंजनगाव सुर्जी तालुक्यात ६ कोटी ५२ लाख २८ हजार ४३ रुपये, भातकुली तालुक्यात ६ कोटी ६९ लाख ९५ हजार ४५८ रुपये, चांदूरबाजार तालुक्यात ७ कोटी ९ लाख ३३ हजार ४७४ रुपये, चांदूररेल्वे तालुक्यात ५ कोटी ५९ लाख २५ हजार ६५२ रुपये, चिखलदरा तालुक्यात १ कोटी ३२ लाख ८२ हजार ३२० रुपये, दर्यापूर तालुक्यात ११ कोटी ७६ लाख ८० हजार ५९० रुपये, धामणगाव तालुक्यात ८ कोटी १३ लाख ४४ हजार ४२७ रुपये, धारणी तालुक्यात १ कोटी १७ लाख ३५ हजार ७३४ रुपये, मोर्शी तालुक्यात ३ कोटी ६० लाख ९६ हजार ६५० रुपये, नांदगाव तालुक्यात १२ कोटी ३ लाख ६० हजार ३२२ रुपये, तिवसा तालुक्यात ६ कोटी ९१ लाख २६ हजार ४८६ रुपये, वरुड तालुक्यात १ कोटी ४७ लाख ७६ हजार ४७५ रुपये मिळणार आहे. (प्रतिनिधी)

नांदगाव तालुक्याला सर्वाधिक लाभ
नांदगाव खंडेश्वर तालुक्यामधील १७ हजार ५३२ शेतकऱ्यांनी १४ हजार १४७ हेक्टर क्षेत्रासाठी २४ कोटी ७८ लाख २९२ हजार रुपयांचा विमा संरक्षीत केला होता. यासाठी ९३ लाख १५ हजार ९५४ रुपयांचा विमा हप्त्याचा भरणा केला. नुकसान भरपाई पोटी १७ हजार २५२ शेतकऱ्यांना १२ कोटी ३ लाख ६० हजार ३२२ रुपये मिळणार आहे.

Web Title: 83 crores compensation in eight crores insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.