८,४०६ विद्यार्थ्यांनी दिली सीईटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:16 AM2018-05-11T01:16:42+5:302018-05-11T01:16:42+5:30
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत(सीईटी सेल) येत्या शैक्षणिक वर्षासाठी इंजिनीअरिंग व औषध निर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या, डी-फार्म अभ्यासक्रमाचे व कृषी अभियांत्रिकी कृषी विज्ञान प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षा शहरातील २९ केंद्रांवर घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत(सीईटी सेल) येत्या शैक्षणिक वर्षासाठी इंजिनीअरिंग व औषध निर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या, डी-फार्म अभ्यासक्रमाचे व कृषी अभियांत्रिकी कृषी विज्ञान प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षा शहरातील २९ केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेसाठी तीन पेपर मिळून ९ हजार ७० विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज केले होते. त्यापैकी तीन पेपर मिळून ८ हजार ४०६ विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली, तर ६६४ विद्यार्थी तीनही पेपर मिळून गैरहजर राहिलेत.
इंजिनीअरिंग, फार्मसी आणि कृषी अशा तीनही क्षेत्रातील प्रवेशांसाठी ही परीक्षा गुरूवारी घेण्यात आली आहे.या तिन्ही परीक्षेला जिल्हाभरातील एकूण ९ हजार ७० विद्यार्थ्यानी नोंदणी केली होती. त्यानुसार गणित पेपरसाठी ७ हजार १२१ विद्यार्थ्यांपैकी ६ हजार ९१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर २०२ विद्यार्थी परीक्षेला गैरहजर होते. फिजिक्स, केमेस्ट्री पेपरसाठी ९ हजार ७० विद्यार्थ्यांपैकी ८ हजार ८११ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर २५९ विद्यार्थी गैरहजर होते. बायोलॉजी पेपरसाठी ६,७०० विद्यार्थ्यानपैकी ६,४९७ विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग घेतला होता. २०३ विद्यार्थी परीक्षेला गैरहजर होते. एकूण तिन्ही पेपर मिळून ९ हजार ७० विद्यार्थ्यानपैकी ८ हजार ४०६ विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग घेतला. ६६४ जणांनी परीक्षेला अनुउपस्थित होते. शहरातील २९ परीक्षा केंद्रांवर सीईटीची परीक्षा शांततेत पार पडल्याचे सूत्रांनी सांगितले.
तीन गटांमध्ये विभागणी
एमएम (फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथेमॅटिक्स),एमबी(फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथेमॅटिक्स) आणि बीबी (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी) अशा तीन गटांमध्ये विद्यार्थ्यांची विभागणी करण्यात आली होती. एमएम गटातील विद्यार्थी इंजिनीअरिंग, एमबी गटातील विद्यार्थी हे इंजिनिअरिंग आणि फार्मसी, तर पीसीबी गटातील विद्यार्थ्यांनी फार्मसीच्या प्रवेशासाठी सीईटी दिली आहे. फार्मसी आणि इंजिनीअरिंग अशा दोन्ही गटांसाठी सर्वाधिक विद्यार्थी होते. त्याखालोखाल स्वतंत्र इंजिनीअरिंग आणि फार्मसी गटांसाठी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.