'अॅलेक्स'साठी बनविला ८५ हजारांचा निवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 10:47 PM2018-07-28T22:47:41+5:302018-07-28T22:47:57+5:30
महिनाभरापूर्वी वेलकम पॉइंट येथे बेवारस आणि जखमी स्थितीत आढळलेल्या घोड्यावर वैद्यकीय उपचार करून प्राणिपे्रंमीने ८५ हजारांचा निवारा दिला. सायंके दाम्पत्याचे बेवारस घोड्यासाठीचे दातृत्व कौतुकास्पद असून, त्यांनी मुलांच्या प्राणिप्रेमाला प्रोत्साहन दिल्याने ही बाब प्रेरणादायी ठरत आहे.
ठळक मुद्देसायंके दाम्पत्याचे बेवारस घोड्यासाठी दातृत्व : मुलांच्या प्राणिप्रेमाला प्रोत्साहन
<p>लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महिनाभरापूर्वी वेलकम पॉइंट येथे बेवारस आणि जखमी स्थितीत आढळलेल्या घोड्यावर वैद्यकीय उपचार करून प्राणिपे्रंमीने ८५ हजारांचा निवारा दिला. सायंके दाम्पत्याचे बेवारस घोड्यासाठीचे दातृत्व कौतुकास्पद असून, त्यांनी मुलांच्या प्राणिप्रेमाला प्रोत्साहन दिल्याने ही बाब प्रेरणादायी ठरत आहे.
वसाचे सर्पमित्र मुकेश वाघमारे आणि अनिकेत सरोदे यांनी बेवारस घोड्याबाबत संस्थेला अवगत केले. त्यानंतर वसाचे निखिल फुटाणे, रोहित रेवाळकर, प्रशिक समदुरे, अनिकेत सरोदे, यश साबळे, वाहनचालक रोशन आवारे, गणेश अकर्ते व शुभम सायंके यांनी घोड्याला पकडले. महिनाभर उपचार केल्यानंतर त्याच्या विशेष काळजीसाठी त्याला वसा रेस्क्यू सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. या बेवारस आणि पायाने पंगू असलेल्या घोड्याला वसाचे शुभम सायंके यांनी ‘अॅलेक्स’ नाव दिले. याची संपूर्ण व्यवस्था व्हावी, याकरिता गजानन सायंके व त्यांच्या सौभाग्यवती वनिता सायंके यांनी वेगळे ८५ हजारांचे घर विकत घेतले. ते घर वसा संस्थेच्या अध्यक्षांना भेटस्वरूपात दिले. गजानन सायंके हे पेशाने प्राथमिक शाळेवर सहायक शिक्षक असून, त्यांची पत्नी उत्तमसरा ग्रामपंचायतच्या सदस्या आहेत. त्याचप्रमाणे अॅलेक्सच्या जेवणाची जबाबदारी गावातील शेतकरी धम्मानंद राऊत यांनी स्वीकारली आहे. अॅलेक्सचा पाय पूर्णपणे बरा व्हायला दीर्घकाळ लागणार असल्याचे पशु शल्यचिकित्सक अनिल कुलकर्णी यांनी सांगितले. यानंतर अॅलेक्सचे पूर्ण जीवन सुखात व आरामात जावे, याकरिता वसाचे भूषण सायंके, पंकज मालवे, मंगेश सायंके, राहुल सुखदेवे, निखिल फुटाणे आणि गणेश अकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत.