८८० बेरोजगारांना संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 10:33 PM2017-12-22T22:33:58+5:302017-12-22T22:34:17+5:30
आॅनलाईन लोकमत
अमरावती : महानगरपालिका, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, महिला व बाल कल्याण समिती, दीनदयाळ अन्तोदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन सांस्कृतिक भवन येथे २२ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. यामधून ८८० बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त झाली.
रोजगार मेळाव्यामध्ये रेमंड प्रा.लि. (नांदगाव पेठ) २०० पदे, धूत ट्रान्समिशन (पैठण) १०० पदे, पियाजिओ व्हेइकल्स प्रा.लि. (बारामती) १५५ पदे, नवभारत फर्र्टिलायझर (नागपूर) ३० पदे, सियाराम मिल्स प्रा.लि. (नांदगावपेठ) १० पदे, रेग्झा कॉटन सिटी (अमरावती) ५० पदे, अक्सिस सिक्यूरिटी व एमडीएच ५० पदे अशी भरती होती. एकूण ४५१३ उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी ८८० उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. मेळाव्यादरम्यान अनेक युवकांनी स्वच्छता अॅप डाऊनलोड करून स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये आपला सहभाग नोंदविला. महापालिका उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी हे देखणे आयोजन केले.
रोजगार मेळाव्याचे उद्घाटन उपमहापौर संध्या टिकले, मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार, स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, झोन क्र. ३ सभापती माला देवकर, शिक्षण समिती सभापती चेतन गावंडे, महिला व बाल कल्याण समिती सभापती कुसुम साहू, शिक्षण समिती उपसभापती पद्मजा कौंडण्य, महिला व बालकल्याण समिती उपसभापती संगीता बुरंगे, शहर सुधार समिती उपसभापती नूतन भुजाडे, नगरसेविका नीता राऊत, रेखा भुतडा, जयश्री डहाके, निलिमा काळे, सुनीता भेले, स्वाती कुळकर्णी, वंदना कंगाले, रिता पडोळे, जयश्री कुऱ्हेकर, अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे, उपआयुक्त नरेंद्र वानखडे, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी प्रफुल्ल शेळके, शहर अभियंता जिवन सदार, सहा. संचालक नगर रचना सुरेंद्र कांबळे, सहा. आयुक्त मंगेश वाटाणे, सुनील पकडे, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर तसेच मेळाव्यात उपस्थित एच.आर. ओकलकर, विजय तांदळे, मनोज सर, विजय कुमार, नितीन काळमेघ यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हा कौशल्य विकास अधिकारी प्रफुल्ल शेळके यांनी केले.