जिल्ह्यातील ९० सिंचन प्रकल्पांत ८९.४९ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:14 AM2021-09-27T04:14:19+5:302021-09-27T04:14:19+5:30
अमरावती: सद्यस्थितीत जिल्ह्यताील एक मोठा, पाच मध्यम व ८४ लघु असे एकूण ९० सिंचन प्रकल्पात सरासरी ८९.४९ टक्के ...
अमरावती: सद्यस्थितीत जिल्ह्यताील एक मोठा, पाच मध्यम व ८४ लघु असे एकूण ९० सिंचन प्रकल्पात सरासरी ८९.४९ टक्के पाणीसाठा साचला आहे. काही दिवस आणखीन पाऊस असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आणखीन पाऊस झाल्यास पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
यंदा अपेक्षित पाऊस झाला. त्यामुळे सिंचन प्रकल्प भरल्याने पिण्याच्या पाण्यासह भविष्यातील सिंचनासाठी प्रकल्पातून पाणी देता येणार आहे. उर्ध्व वर्धा प्रकल्पात ९८.३६ टक्के पाणीसाठा साचला आहे. या प्रकल्पाचे ३ गेट ४० सेंमीने उघडण्यात आले असून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
तसेच पाच मध्यम प्रकल्पात सरासरी ७५.९४ टक्के तर, ८४ लघु प्रकल्पात ८०.५१ टक्के पाणीसाठा आहे. शहानूर मध्यम प्रकल्पात ९८.११ टक्के पाणीसाठा असून दोन गेट २.५ सेमींने, चंद्रभागा ९३.९९ टक्केसाठा तीन गेट ५ सेंमीने, पूर्णा ९०.५३ टक्के पाणीसाठा दोन गेट ५ सेंमीने, सपन प्रकल्पात ९५.०३ टक्के तर दोन गेट ५ सेंमीने उघडण्यात आले. पंढरीमध्ये २२.४३ टक्के पाणीसाठा आहे. दोन ते तीन दिवस आणखीन पावसाचे असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी व्यक्त केला.