कारागृहातील सात बंदीजनांना ९० दिवसांची विशेष माफी

By admin | Published: January 7, 2016 12:13 AM2016-01-07T00:13:15+5:302016-01-07T00:13:15+5:30

येथील मध्यवर्ती कारागृहातील सात बंदीजनांना शिक्षेत ९० दिवसांची विशेष माफी मिळाली आहे.

90 days of special remission for seven prisoners in jail | कारागृहातील सात बंदीजनांना ९० दिवसांची विशेष माफी

कारागृहातील सात बंदीजनांना ९० दिवसांची विशेष माफी

Next

अप्पर पोलीस महासंचालकांचे पत्र : बंदी कलारजनी कार्यक्रमात सहभाग
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहातील सात बंदीजनांना शिक्षेत ९० दिवसांची विशेष माफी मिळाली आहे. याबाबतचे कारागृह अप्पर पोलीस महासंचालकांचे पत्र प्राप्त झाले असून ‘बंदी कलारजनी’ कार्यक्रमात सहभाग घेतल्याचे हे बक्षीस मानले जात आहे.
नागपूर येथे विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात ‘बंदी कलारजनी तिमिरातून तेजाकडे’ हा गीतगायनाचा अप्रतिम कार्यक्रम १७ डिसेंबर रोजी बंदीजनांनी सादर केला होता. कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. बंदीजनांनी सादर केलेला कलाविष्कार बघून मंत्र्याचेही मन गहिवरले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या कार्यक्रमास हजर राहून त्यांनी बंद्यांच्या कला सादरीकरणाने प्रभावित होऊन त्यांनी कैद्यांचे कौतुक केले.

बंदीजनांमध्ये आनंद
अमरावती : या कार्यक्रमात राज्यभरातून बंदीजन सहभागी होऊन कलाविष्कार सादर करतात. यात अमरावती मध्यवर्ती कारागृहातील ११ बंदी जणांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. मात्र माफीस देय असलेल्या सात बंदीजनांच्या शिक्षेत ९० दिवसांची विशेष माफी देण्याचा निर्णय कारागृह प्रशासन अप्पर पोलीस महासंचालकांनी घेतला आहे. तब्बल तीन महिने विशेष माफी मिळाल्याने संबंधित बंदी जणांच्या चेहऱ्यावर आनंद झळकले आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात ‘तिमिरातून तेजाकडे’ हा बंदी रजनी कार्यक्रम १० वर्षानंतर सादर करण्यात आला आहे.
बंदीजनांच्या आवाजाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. या कार्यक्रमात कलाविष्कार सादरीकरणाची प्रतीक्षा बंदी जणांना राहते. परिश्रमाचे फलित म्हणजे सात बंद्यांना विशेष माफी मिळाली आहे.(प्रतिनिधी)

Web Title: 90 days of special remission for seven prisoners in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.