बाजार समितीत आढळली ९० क्विंटल बेवारस तूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2017 12:10 AM2017-03-24T00:10:37+5:302017-03-24T00:10:37+5:30

अचलपूर बाजार समितीमध्ये तब्बल ९० क्विंटल तूर बेवारस स्थितीत आढळून आल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.

90 quintals irrespective of the market found in the market committee | बाजार समितीत आढळली ९० क्विंटल बेवारस तूर

बाजार समितीत आढळली ९० क्विंटल बेवारस तूर

Next

सभापतींद्वारे जप्ती : कुणीच सांगेना मालकी हक्क, व्यापाऱ्यांमध्ये खळबळ
परतवाडा : अचलपूर बाजार समितीमध्ये तब्बल ९० क्विंटल तूर बेवारस स्थितीत आढळून आल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. बुधवारी दुपारी २ वाजता सभापतींनी पंचनामा करून ही तूर जप्त केली. पाच लाख रूपये किमतीची ही तूर कुणाची, यावर मात्र सगळ्यांनीच मौन बाळगले आहे. शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्याने तर हे कारस्थान केले नाही ना, अशी परिसरात चर्चा आहे. अचलपूर बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये नाफेडमार्फत तूर खरेदी सुरु आहे. शेतकऱ्यांद्वारे लावण्यात आलेल्या तुरीच्या ढिगांचे मोजमाप टोकन पद्धतीने करण्यात येते. बुधवारी कूण ९० क्विंटल तूर कुणाची, हे कळूच शकले नाही. या तुरीची बराचवेळ चौकशी करूनही त्या तुरीचा मालक पुढे आला नाही. परिणामी बाजार समिती सभापती अजय पाटील टवलारकर यांनी सचिव मंगेश भेटाळू यांना तूर जप्तीचे आदेश दिलेत. संचालक पोपट घोडेराव, साहेबराव कोठोळे उपस्थित होते.

बुधवारी दुपारी सभापतींनी स्वत: ९० क्विंटल बेवारस तूर जप्त केली. ती जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आली असूून अंदाजे पाच लक्ष रुपये किंमत काढण्यात आली आहे.
- मंगेश भेटाळू,
सचिव, बाजार समिती, अचलपूर

Web Title: 90 quintals irrespective of the market found in the market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.