रेशनच्या तांदळाचा ९० क्विंटल साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:12 AM2021-05-27T04:12:41+5:302021-05-27T04:12:41+5:30
एक लाख ८१ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त; शिरजगाव कसबा पोलिसांची कारवाई पान २ लीड फोटो - २६ पी ...
एक लाख ८१ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त;
शिरजगाव कसबा पोलिसांची कारवाई
पान २ लीड
फोटो - २६ पी चांदूर बी - कट्ट्याचे फोटो
शिरजगाव कसबा पोलिसांची कारवाई, पावणेदोन लाखांचा मुद्देमाल
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : तालुक्यातील शिरजगाव कसबा येथे शेतातील टिन शेडमध्ये साठवलेला ९० क्विंटल तांदळाचा साठा पोलिसांनी जप्त केला. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत १ लाख ८१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस सुत्रांनुसार, शिरजगाव कसबा येथील शांतीलाल मंगल कार्यालयाजवळील कमलेश्वर मनोहर केदार (४६) यांच्या शेतातील टिन शेडमध्ये मोठ्या प्रमाणात तांदूळ अवैधरित्या साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकली असता, मोठ्या प्रमाणात रेशनचा तांदूळ आढळला. याठिकाणी जप्त केलेल्या तांदळाचे अंदाजे वजन ९० क्विंटल ७५ किलो आहे.
शिरजगाव कसबाचे ठाणेदार पंकज दाभाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज सुरवाडे, उपनिरीक्षक टेकाडे, पोलीस नाईक कॉन्स्टेबल माकोडे, कॉन्स्टेबल अंकुश अरबट, अमोल नंदरधने, आदींचा या कारवाई पथकात समावेश होता.
खताच्या पोत्यांमध्ये साठवला तांदूळ
याठिकाणी तांदूळ रासायनिक खतांच्या १६५ रिकाम्या प्लास्टिक पोत्यांमध्ये साठवून ठेवण्यात आला होता. प्रत्येक पोत्याचे अंदाजे वजन ५५ किलो एवढे आहे. पोलिसांनी हा तांदूळ जप्त करून शिरजगाव ठाण्यात ठेवला आहे.
तहसीलदारांकडून चौकशीचे आदेश
दरम्यान, जप्त केलेला तांदूळ रेशनचा असल्यामुळे पुढील कारवाईसाठी चांदूर बाजारच्या तहसीलदारांना पोलीस ठाण्याकडून रितसर पत्र देण्यात आले. त्यानुसार मंगळवारी रात्री तहसीलदार धीरज स्थूल यांनी शिरजगाव गाठले आणि तांदळाच्या साठ्याची पाहणी केली. त्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
महसूल विभागाच्या कारवाईकडे लक्ष
पोलीस कारवाईत जप्त केलेला रेशनचा तांदूळ कोरोनाकाळात गरिबांना मोफत वाटण्यासाठी आलेला असावा, अशी नागरिकांची शंका आहे. हा एवढा मोठा साठा एकाच व्यक्तीकडे कसा गेला, याची चौकशी होणे गरजेचे आहे. रेशन धान्याच्या उघ़ड झालेल्या व अनेक वर्षांपासून होत असलेल्या अनागोंदीवर महसूल विभाग काय कारवाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.