९०० ऑटो चालकांना मिळाले लॉकडाऊनचे १५०० रूपये अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:10 AM2021-06-04T04:10:57+5:302021-06-04T04:10:57+5:30

आरटीओकडे जिल्ह्यात ५ हजार ८०० परवानाधारक ऑटोचालकांची नोंद आहे. त्यापैकी साडेतीन हजार ऑटो अमरावती शहरात आहेत. मात्र अनेक ऑटो ...

900 auto drivers get Rs 1,500 lockdown grant | ९०० ऑटो चालकांना मिळाले लॉकडाऊनचे १५०० रूपये अनुदान

९०० ऑटो चालकांना मिळाले लॉकडाऊनचे १५०० रूपये अनुदान

Next

आरटीओकडे जिल्ह्यात ५ हजार ८०० परवानाधारक ऑटोचालकांची नोंद आहे. त्यापैकी साडेतीन हजार ऑटो अमरावती शहरात आहेत. मात्र अनेक ऑटो चालकांनी मोबाईल क्रमांकाशी आधारलिंक केली नाही. परवानाधारक ऑटो चालकांनी ऑनलाईन अर्ज करण्यापुर्वी त्यांच्या बँक खात्याशी आधारकार्डलिंक व मोबाईल क्रमांकाशी जोडणे आवश्यक राहणार आहे. आधारलिंक न केल्याने सानुग्र अनुदान देताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे बॅक खात्याशी आधारलिंक करावी आरटीओने जारी केलेल्या संकेतस्थळावर नोंदणीकृत परवानाधारक ऑटोचालकाने तातडीने अर्ज करावे असे आवाहान प्रादेशिक परिवहन अधिकारी रामभाऊ गिते यांनी सांगितले. अर्ज पडताळणीनंतर ऑटोचालकांच्या खात्यात त्वरीत अनुदानाची रक्कम जमा केली जाईल. रिक्षा चालकाने ‘ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हरमेंट डॉट इन’ या लिंकवर जावून ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

बॉक्स:

मोबाईल क्रमांकावर ऑटोपी क्रमांक प्राप्त होईल

ऑनलाईन प्रणालीवर अर्ज करताना आधारकार्ड सोबत लिंक असलेल्य ा मोबाईल क्रमांकावर ओटीपी क्रमांक प्राप्त झाल्यानंतर ऑनलाईन अर्जात त्यांचा वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांक नोंद करावी लागणार आहे.

Web Title: 900 auto drivers get Rs 1,500 lockdown grant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.