अप्परवर्धा धरणात 90.53 टक्के जलसाठा, स्थानिकांची पाण्याची चिंता मिटली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 02:57 PM2017-09-21T14:57:38+5:302017-09-21T14:59:58+5:30

विदर्भात सर्वाधिक जल संचय क्षमता असलेल्या अप्पर वर्धा धरणात ९०.५३ टक्के जलसाठा झाल्याची माहिती धरण व्यवस्थापन सूत्रांकडून मिळाली आहे.

90.53 percent water stock in the Upwarvardha dam, the concern of water for local people came to an end | अप्परवर्धा धरणात 90.53 टक्के जलसाठा, स्थानिकांची पाण्याची चिंता मिटली

अप्परवर्धा धरणात 90.53 टक्के जलसाठा, स्थानिकांची पाण्याची चिंता मिटली

Next

अमरावती, दि. 21 - विदर्भात सर्वाधिक जल संचय क्षमता असलेल्या अप्पर वर्धा धरणात ९०.५३ टक्के जलसाठा झाल्याची माहिती धरण व्यवस्थापन सूत्रांकडून मिळाली आहे. मंगळवार, बुधवारी मध्य प्रदेशसह धरण क्षेत्रातील परिसरात दमदार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक गतीने झाली. त्यामुळे अपेक्षेपेक्षा अधिक पाणीसाठा अप्परवर्धा धरणात झाला आहे. यावर्षी विदर्भात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाले अद्यापही कोरडेच आहेत. त्यामुळे यावर्षी सिंचनासाठी पाणी मिळणार नाही, या विवंचनेत शेतकरी होते; तथापि उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्यासाठी पाणीटंचाई भासेल, या उद्देशाने जीवन प्राधिकरण विभाग, महापालिका प्रशासनाने बैठक घेऊन पाणी कपातीचा आढावा घेतला होता. 

त्याअनुषंगाने १५ दिवसांपूर्वीच नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला व त्याची अंमलबजावणीही सुरू झाली होती. मात्र आता आवश्यकतेपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्याने नागरिकांसह शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. धरणात पाण्याची अधिक आवक पाहता गेट उघडण्याचा मानस धरण व्यवस्थापनाने केला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारादेखील देण्यात आला आहे.

राज्यातील २४ धरणे ओव्हर फ्लो

दरम्यान, राज्यात दोन दिवसांत पावसाने जोर धरल्याने, ३७ पैकी २४ धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यातून आता पाणी सोडणे सुरू झाले आहे. पुणे विभागातील १८ पैकी १६ धरणांतून पाणी सोडले आहे. मराठवाड्यातील जायकवाडी आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोयना धरण पूर्णपणे भरत आले आहे. त्यातील जलसाठा कमाल पातळीला पोहोचल्यानंतर धरणांचे दरवाजे उघडावे लागतील, असे जलसंपदामंत्री
गिरीश महाजन यांनी सांगितले. बुधवारी सकाळी ८ वाजल्यापासून निरा देवघर सांडव्याचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून, ३,६४० व पावरहाउसमधून ७५० असे एकूण ४,३९० क्युसेक्स पाणी नीरा नदीत सोडले जात आहे. वडीवळेमधून १३७, भाटघरमधून २,१६७ आणि मुळशीमधून ७००० क्युसेक्स पाणी सोडले जात असल्याचे ते म्हणाले.

नाशिक जिल्ह्यात पावसाने नदी, नाल्यांना पूर आला आहे. खरिपाच्या पेरण्या शंभर टक्क्यांपेक्षा अधिक झाल्या आहेत. २० सप्टेंबरपर्यंत सरासरीच्या ११२ टक्के पाऊस झाला आहे. इगतपुरी, त्र्यंबकला अतिवृष्टीची नोंद झाली. मालेगाव, नांदगाव, कळवण, बागलाण, देवळा हे तालुके कोरडेच आहेत.

तर जायकवाडीचे दरवाजे उघडणार
जायकवाडी धरणात पाण्याची मोठी आवक सुरू आहे. वरच्या
सर्व धरणांतून मोठा विसर्ग सुरू असल्यामुळे, धरणात १,९२५.३० दलघमी पाणीसाठा (क्षमता २,१७१ दलघमी) झाला आहे. ते २,१७१ च्या वर गेल्यास दरवाजे उघडावे लागतील. कोयना धरणाने २८०४.८६ दलघमीची पातळी (क्षमता २,८२६ दलघमी) ओलांडल्याने सहा दरवाजे उघडण्यात आल्याचे महाजन म्हणाले. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी विदर्भात जोरदार, कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भात ‘पाणी’बाणी
३३.३८ टक्के पाणीसाठा अमरावती विभागामधील धरणांत जमा आहे. तर ३५.६९ टक्के पाणीसाठा नागपूर विभागामधील धरणांत जमा आहे.

Web Title: 90.53 percent water stock in the Upwarvardha dam, the concern of water for local people came to an end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.