तालुक्यात ९१६ उमेदवारी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:09 AM2021-01-01T04:09:02+5:302021-01-01T04:09:02+5:30
चांदूरबाजार : तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींसाठी एकूण ९१६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. २३ ते ३० डिसेंबरदरम्यान ही नामांकन ...
चांदूरबाजार : तालुक्यात ४१ ग्रामपंचायतींसाठी एकूण ९१६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. २३ ते ३० डिसेंबरदरम्यान ही नामांकन प्रक्रिया चालली. दरम्यान मागील आठवड्यात सलग तीन दिवसांची सुटी आल्याने पॅनेलप्रमुखांना पुरेसी सवड मिळाली. त्यामुळे बहुतेक सर्वच पॅनेलमधील उमेदवार निश्चित करण्यात आले.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. सुरुवातीच्या दोन दिवसांत तालुक्यात ७१ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. ख्रिसमस, चौथ्या शनिवार व रविवारमुळे उमेदवारी अर्ज दाखल करणे तीन दिवस बंद होते. सोमवारपासून तीन दिवसांच्या सुटीनंतर शासकीय कार्यालये सोमवारपासून पुन्हा सुरू झालीत. त्यात सोमवारी २९५, मंगळवारी ३०२ व बुधवारी अंतिम दिवशी २४३ असे एकूण ९१६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
त्यांची झाली गोची
या वेळेस उमेदवारी दाखल करताना उमेदवारास चारित्र्यासंबंधी स्वयं घोषणापत्र देणे आवश्यक करण्यात आहे. तसेच आपल्यावर गुन्हा दखल असल्यास, होणाऱ्या कारवाईला मी जबाबदार राहील, असेही स्वयंघोषणापत्र लिहून द्यावे लागते. त्यामुळे गुन्हे दाखल असलेल्या अनेक इच्छुकांची, नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वीच गोची झाली आहे. यावेळच्या ग्राम पंचायत निवडणुकीत एक वेगळीच राजकीय रंगत पाहायला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.