आता पोरं ऐसपैस शिकणार, ७७ शाळांमध्ये ९३ वर्गखोल्यांचा प्रस्ताव

By जितेंद्र दखने | Published: October 10, 2023 07:05 PM2023-10-10T19:05:54+5:302023-10-10T19:07:18+5:30

जिल्हा परिषद : २३ वर्गखोल्यांसाठी अडीच कोटींचा निधी.

93 classrooms proposed in 77 schools in amravati zp school | आता पोरं ऐसपैस शिकणार, ७७ शाळांमध्ये ९३ वर्गखोल्यांचा प्रस्ताव

आता पोरं ऐसपैस शिकणार, ७७ शाळांमध्ये ९३ वर्गखोल्यांचा प्रस्ताव

जितेंद्र दखने, अमरावती : मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिकस्त वर्गखोल्यांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. मात्र, आता त्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने भर दिला असून, जिल्ह्यातील १४ पंचायत समित्यांतर्गत ७७ शाळांमध्ये नव्याने ९३ वर्गखोल्यांचे बांधकाम प्रस्तावित असून, प्रथम टप्प्यात २३ वर्गखोल्यांचे बांधकाम केले जाणार आहे. त्यादृष्टीने प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, नवीन बांधकामासाठी २ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रशासकराज मध्येच वर्गखोल्यांचा कायापालट होणार असल्याने शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक शाळांमधील शिकस्त वर्गखोल्यांमध्ये वर्ग भरत असल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. अनेक शाळांचे छप्पर शिकस्त आहेत तर काही शाळांच्या भिंती पडक्या आहेत. अशाही स्थितीत अनेक ठिकाणी शाळा भरविण्यात येतात. मात्र, मध्यंतरी प्रशासनाने मात्र आता प्रशासकराज मध्येच शिकस्त वर्गखोल्यांची दखल घेत नवीन वर्गखोल्यांना मान्यता मिळाली. त्यासाठी निधीसुद्धा देण्यात आला आहे. एका वर्गखोलीच्या कामाला सुरुवात केली. अनेकदा शिकस्त बांधकामासाठी ११ लाख याप्रमाणे वर्गखोल्यांचा मुद्दा चर्चेला आला. मात्र, २ कोटी ४२ लाखांचा निधी राहणार, निधीअभावी तो थंडबस्त्यात पडला. मात्र, आता प्रशासक राजवटीमध्येच नवीन खोल्यांना मान्यता मिळाली असून, त्यासाठी निधीसुद्धा उपलब्ध करून दिला आहे. एका वर्गखोलीच्या बांधकामासाठी ११ लाख याप्रमाणे २ कोटी ४२ लाखांचा निधी मिळाला आहे. उर्वरित शाळांनाही लवकरच बांधकामासाठी निधी दिला जाणार आहे.

तालुकानिहाय नवीन वर्गखोल्यांची संख्या

जि. प. शाळा उर्दू पोहरा, वडगाव जिरे, अंजनगाव बारी कन्याशाळा, पिंपरी यादगिरे, अंजनगाव बारी उर्दू शाळा अशा अमरावती तालुक्यातील ११, भातकुली : ४ जि. प. मराठी शाळा, निभा, जि. प. उर्दू शाळा भातकुली, अचलपूर : १ (जि. प. शाळा, देवगाव), चिखलदरा : १ (जि. प. शाळा, कालापांढरी), मोशी : २ (जि. प. शाळा, दापोरी, जि. प. शाळा, धामणगाव काटपूर), चांदूर रेल्वे १ (जि. प. शाळा, आमला), नांदगाव खंडेश्वर १ (जि. प. शाळा, हिवरा बु.), चांदूर बाजार : १ (जि. प. शाळा सैफीनगर उर्दू).

Web Title: 93 classrooms proposed in 77 schools in amravati zp school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.