जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत 94 टक्के मतदान, 48 उमेदवारांचे भाग्य सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 05:00 AM2021-10-05T05:00:00+5:302021-10-05T05:00:55+5:30

उमेदवारांसह समर्थकांनीदेखील सुटकेचा नि:श्वास सोडला. अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल येथे अमरावती व भातकुली तालुक्यांसाठी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले होते. तर, उर्वरित १२ तालुक्यांचे मतदान तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये केंद्रे निश्चित करण्यात आले होते. भातकुली, तिवसा, चिखलदरा, मोर्शी, चांदूररेल्वे तालुक्यात १०० टक्के मतदान झाल्याची माहिती आहे.

94 per cent turnout in District Bank elections, seal the fate of 48 candidates | जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत 94 टक्के मतदान, 48 उमेदवारांचे भाग्य सील

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत 94 टक्के मतदान, 48 उमेदवारांचे भाग्य सील

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत १७ संचालक पदांच्या निवडीसाठी ४८ उमेदवारांचे भाग्य सोमवारी मतपेटीत सील झाले. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या कालावधीत एकूण १,६८७ पैकी १,५७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ९४ टक्के मतदान झाले. मतमोजणी मंगळवार, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरासह ग्रामीण मतदान केंद्रांवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनल अशी थेट लढत दिसून आली. २३ सप्टेंबर रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यानंतर प्रचाराला सुरूवात झाली होती. सोमवारी मतदान आटोपताच 
उमेदवारांसह समर्थकांनीदेखील सुटकेचा नि:श्वास सोडला. अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल येथे अमरावती व भातकुली तालुक्यांसाठी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले होते. तर, उर्वरित १२ तालुक्यांचे मतदान तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये केंद्रे निश्चित करण्यात आले होते. 
भातकुली, तिवसा, चिखलदरा, मोर्शी, चांदूररेल्वे तालुक्यात १०० टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. तर अचलपूर तालुक्यात सर्वात कमी ८३ टक्के मतदान झाले आहे. १०० टक्के मतदान झालेल्या तालुक्यात कुणाला लॉटरी लागते, हे मंगळवारी सायंकाळपर्यंतच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. 

सेवा सहकारी सोसायटीच्या निकालावर सत्तेचे गणित
जिल्ह्यात १४ सेवा सहकारी सोसायट्या आहेत. त्यापैकी नांदगाव खंडेश्वर, तिवसा, धारणी व वरूड अशा चार सेवा सहकारी साेसायट्यांतून संचालक अविरोध निवडून आले आहेत. सोमवारी १० सेवा सहकारी सोसायट्यांमधून संचालकपदाच्या निवडीसाठी मतदान झाले आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर कुणाची सत्ता आरूढ होईल, हे सेवा सहकारी सोसायटीच्या निकालावर अवंलबून राहणार आहे. ज्यांच्या ताब्यात सोसायटी, तेच बॅंकेवर अधिराज्य गाजवतील, असे निकालाच्या पूर्वसंध्येला चित्र दिसून आले. 

उमेदवारांची धडधड वाढली
१७ जागांसाठी ४८ उमेदवार रिंगणात आहेत. मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मात्र, कौल कुणाला, हे मंगळवारी मतमाेजणीअंती स्पष्ट होईल. ओबीसी, व्हीजेएनटी, एससी/एसटी, महिला, नागरी बॅंक, वैयक्तिक अशा प्रवर्गातून कोणत्या केंद्रातून किती मते मिळतील, याचे गणित जुळविताना उमेदवारांमध्ये विजयाचा विश्वास दिसून येत नव्हता.

गाडगेबाबा सभागृहात मतमोजणी
गाडगेनगर येथील संत गाडगेबाबा समाधी मंदिर सभागृहात ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. त्याकरिता जिल्हा उपनिबंधक प्रशासनाने आठ टेबलची व्यवस्था केली आहे. मतमोजणीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. 

मतदान नसलेले राजकुमार पटेल एकमेव उमेदवार
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सोमवारी मतदान घेण्यात आले. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल हे एकमेव मतदान न केलेले उमेदवार ठरले आहेत. धारणी तालुक्यातील साद्रावाडी आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीचे ते संचालक असल्याने त्यांना उमेदवारी मिळाली. परंतु, ते  मतदार नव्हते. त्यामुळे मतदार यादीत त्यांचे नाव नव्हते. 

तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी

अचलपूर  ८३, भातकुली १००, नांदगाव खंडेश्वर ९५, चांदूररेल्वे ९८, तिवसा १००, वरुड १००, धारणी ९६, चिखलदरा १००, दर्यापूर ८८, धामणगाव रेल्वे ९७, चांदूरबाजार ९३, अंजनगाव सुर्जी ९२ टक्के तर अमरावती तालुक्यातही ९६ टक्के मतदान झाले आहे.

 

Web Title: 94 per cent turnout in District Bank elections, seal the fate of 48 candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.