तिवसा बाजार समितीसाठी ९८ टक्के मतदान

By admin | Published: September 7, 2015 12:38 AM2015-09-07T00:38:07+5:302015-09-07T00:38:07+5:30

तालुक्याच्या सहकार क्षेत्रात महत्वपूर्ण असनाऱ्या तिवसा कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रविवारी तिवसा व कुऱ्हा या दोन गावातील मतदान केंद्रात शांततेत पार पडली

98 percent voting for Tivasa Bazar committee | तिवसा बाजार समितीसाठी ९८ टक्के मतदान

तिवसा बाजार समितीसाठी ९८ टक्के मतदान

Next

आज मतमोजणी : सहकार, शेतकरी पॅनलमध्ये सरळ लढत
तिवसा : तालुक्याच्या सहकार क्षेत्रात महत्वपूर्ण असनाऱ्या तिवसा कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रविवारी तिवसा व कुऱ्हा या दोन गावातील मतदान केंद्रात शांततेत पार पडली एकूण ८५६ पैकी ८४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानाची ही ९८ टक्केवारी आहे.
रविवारी झालेल्या या निवडणूकीत सेवा सहकारी संस्था मतदार संघात ४४५ पैकी ४३८ मतदारांनी मतदान केले. ग्रामपंचायत मतदार संघात ३७२ पैकी ३६६ व व्यापारी, अडते मतदार संघात ३९ पैकी ३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. १८ संचालकापैकी मापारी मतदारसंघात सहकार पॅनलचे योगेश कल्याणराव देशमुख यापूर्वीच अविरोध निवडून आले आहे.
बाजार समिती निवडणूकीसाठी आ. यशोमती ठाकूर व माजी आमदार भैयासाहेब ठाकूर यांचे मार्गदर्शनात सहकार पॅनल व शिवसेनेचे संपर्क नेते दिनेश वानखडे, भाजपाच्या प्रदेश सचिव निवेदिता चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद तसरे जिल्हा महिला काँग्रेस कमेटीच्या अध्यक्षा छाया दंडाळे यांचे शेतकरी कल्याण पॅनलमध्ये सरळ सरळ लढत होत आहे. सोमवारी सकाळी स्थानिक मनोरंजन हॉलमध्ये सकाळी ९ वाजता मतमोजणीला सुरुवात होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 98 percent voting for Tivasa Bazar committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.