नऊ महिन्यांत १९९ शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 09:40 PM2018-11-02T21:40:06+5:302018-11-02T21:40:43+5:30

अपुरा पाऊस व बोंडअळीचा प्रकोपामुळे गतवर्षीचा खरीप हंगाम उद्वस्त झाला. यामधून शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली मात्र अटी शर्र्तींच्या निकषात शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालाच नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीतील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. यंदाच्या १ नोव्हेंबरपर्यत म्हणजेच नऊ महिण्यात १९९ शेतकºयांनी मृत्युचा फास जवळ केला.

99 Farmers Suicide in Nine Months | नऊ महिन्यांत १९९ शेतकरी आत्महत्या

नऊ महिन्यांत १९९ शेतकरी आत्महत्या

Next
ठळक मुद्देधक्कादायक : दोन दिवसांत एका शेतकरी कवटाळतोे मृत्यूला

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अपुरा पाऊस व बोंडअळीचा प्रकोपामुळे गतवर्षीचा खरीप हंगाम उद्वस्त झाला. यामधून शेतकरी सावरावा, यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली मात्र अटी शर्र्तींच्या निकषात शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झालाच नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीतील शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. यंदाच्या १ नोव्हेंबरपर्यत म्हणजेच नऊ महिण्यात १९९ शेतकºयांनी मृत्युचा फास जवळ केला. जिल्ह्यात दर दोन दिवसात एक शेतकरी मृत्युला कवटाळत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
दुष्काळ, नापिकी, यामूळे वाढलेले सावकारांचे व बँकांचे कर्ज, मुला-मूलींचे विवाह, शिक्षण आदी विवंचनेमुळे जगाव कसं? या विवंचनेत शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणाºया शेतकºयाला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शीपणे अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी वंचित राहत आहे व दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढताच आहे. शासनस्तरावर एक जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात १ नोव्हेंबर २०१८ पर्यत तीन हजार ५५४ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये १ हजार ९७२ प्रकरणे पात्र, १ हजार ९७२ अपात्र तर ५२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. दरवर्षी शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढताच असल्याचे चित्र दुदैवी आहे. शेतकरी आत्महत्यामुक्त जिल्हा करण्यासाठी दिर्घकालीन उपाययोजनांची गरज आहे.
राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहे. निराषेच्या गर्तेमधून शेतकरी सावरावा व त्यांचा आर्तिक स्तर उंचावा, यासाठी जानेवारी २०१७ मध्ये जिल्हा प्रशासनाद्वारा जिल्ह्यात ‘बळीराजा चेतना अभियान’ राबविण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला. यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात याचे पथदर्शी स्वरूपात अभियान राबविण्यात येत असतांना सकारात्मक परिणाम मिळाले. जिल्ह्यात मात्र या प्रकल्पाला अद्यापही मान्यता मिळाली नाही.
२००१ पासूनच ३,४१८ शेतकरी आत्महत्या
जिल्ह्यात १ जानेवारी २००१ पासून ३,५२४ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये जानेवारी महिण्यात २६७, फेब्रूवारी २९०, मार्च ३०४, एप्रिल २४८, मे ३००, जून २७२, जुलै २८४, आॅगष्ट ३४३, सप्टेंबर ३३५, आॅक्टोंबर ३१४, नोव्हेंबर २७९, तर डिसेंबर महिण्यात २८८ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याचे धक्कादायक वास्तव आहे.
शेतकरी मिशन अपयशी
राज्यात शेतकरी आत्मत्याप्रवण असणाºया १४ जिल्ह्यासाठी आघाडी सरकारणे कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची स्थापना केली. राज्य शासनाने या मिशलला गती यावी, यासाठी २४ आॅगष्ट २०१५ रोजी या मिशनची पुर्नरचना केली. सध्या यवतमाळचे किशोर तिवारी या मिशनचे अध्यक्ष आहेत. मात्र शेतकºयांच्या आतमहत्या रोखण्यास या मिशनला पुर्णपणे अपयश आले आहे.
यंदा आॅक्टोबर महिण्यात २९ आत्महत्या
*यंदा १९९ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक २९ घटना आॅक्टोबर महिण्यातील आहेत. जानेवारी २३, फेब्रुवारी २०, मार्च २६, एप्रिल १३, मे १४, जून १५, जुलै २०, आॅगष्ट १९ सप्ष्टेंबर २०व आॅक्टोबर महिण्यात २९ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत.

Web Title: 99 Farmers Suicide in Nine Months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.