‘डीपीसी’त ९९.३२ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 10:41 PM2017-09-10T22:41:57+5:302017-09-10T22:42:43+5:30

जिल्हा नियोजन समिती निवडणूक २०१७ साठी रविवार १० सप्टेंबर रोजी मतदान पार पडले. जिल्ह्यात एकूण ९९.३२ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

99.32 percent voting in the DPC | ‘डीपीसी’त ९९.३२ टक्के मतदान

‘डीपीसी’त ९९.३२ टक्के मतदान

Next
ठळक मुद्देनिवडणूक : ४३८ पैकी ४३५ सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा नियोजन समिती निवडणूक २०१७ साठी रविवार १० सप्टेंबर रोजी मतदान पार पडले. जिल्ह्यात एकूण ९९.३२ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सर्वत्र शांततेत व उत्साहात मतदान झाले. या निवडणुकीसाठी ९ मतदान केंद्रांची व्यवस्था होती. यात जि.प.मतदार संघासाठी जिल्हा नियोजन भवनात मतदान घेण्यात आले. महापालिका मतदारसंघासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय अमरावती येथे तर दर्यापूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात अंजनगाव सुर्जी, दर्यापूर नगरपरीषद सदस्यांसाठी, तर अचलपूर उपविभागीय कार्यालयात चांदूर बाजार, अचलपूर, चिखलदरा, नगरपरीषद व धारणी नगरपंचायतीसाठी मतदान केंद्र होते. चांदूर रेल्वे येथे धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नगरपरीक्षद व नांदगाव खंडेश्र्वर नगरपंचायतीसाठी तर मोर्शी येथे, मोर्शी, वरूड, शेंदूजनाघाट, नगरपरीषदांसाठी मतदान केंदाची व्यवस्था होती. या निवडणूकीकरिता महिला व पुरूष असे एकूण ४३८ मतदार होते. जिल्हा परिषदेच्या ४ अविरोध जागांचा अपवाद वगळता उर्ववित १६ जागासाठी २२ उमेदवार रिंगणात होते. यासाठी ५९ झेडपी सदस्यांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. यात २९ पुरूष व ३० महिला मतदारांचा समावेश आहे. झेडपीसाठी दुपारी २ वाजेपर्यत १०० टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. तर महापालिका मतदार संघात १ अविरोध जागेचा अपवाद सोडला तर उर्वरित ६ जागेकरीता १२ जण रिंगणात होते. यात ४० पुरूष व ४७ महिला मतदार आहेत.
सर्व ८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. या मतदानाची १०० टक्के आहे. तर नगरपरीषदेच्या ४ पैकी १ जागेचा अपवाद वगळता याठिकाणी ३ जागेसाठी ८ जण रिंगणात होते. यात ११० पुरूष व ११४ महिला मतदार आहेत. यापैकी २२२ पुरूष व महिला मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ९९.११ आहे. आणि नगरपंचायतींच्या १ जागेकरीता ३ उमेदवार रिंगणात होते. या मतदार संघात ३२ पुरूष आणि ३६ महिला मतदार आहेत. यापैकी ६७ पुरूष महिलांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. या मतदानाची टक्केवारी ९८.५३ ऐवढी आहे. एकूणच जिल्हा नियोजन समितीच्या २६ जागेसाठी ९९.३२ टक्के मतदान झाले आहे. यासाठी ४५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.या सर्व उमेदवारांचे भाग्य रविवारी मतपेटी बंद झाले आहे. या निवडणूकीत ४३८ र्पैकी नगरपंचायतीचे १ व नगरपरीषदेच्या दोन अशा तिघांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नसल्याचे निवडणूक विभागाने दिलेल्या आकडेवारी वरून दिसून येते. निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनात अपर जिल्हाधिकारी के.आर परदेशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. याकिरता उपजिल्हाधिकारी रामदास सिध्दीभट्टी, गजेंद्र बावणे तसेच अमरावती, चांदूररेल्वे, दर्यापूर, अचलपूर, मोशी आदी ठिकाणचे उपविभागीय अधिकारी यांनी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
८७ नगरसेवकांकडून मतदान
महापालिकेच्या ८७ नगरसेवकांनी जिल्हा डीपीसीच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. मनपा क्षेत्रातील ७ पैकी एका जागेवर राधा कुरील या अविरोध निवडून आल्यात. तेथे ६ जागांसाठी मतदान पार पडले.
अभ्यंकर यांचा ऐनवेळी पाठिंबा
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हा परिषद सदस्य प्रताप अभ्यंकर हे अनुसूचित जाती मतदारसंघातून रिंगणात होते. मात्र, त्यांनी ऐनवेळी पक्षाच्या हिताचे दृष्टीने आपली उमेदवारी मागे घेतली. त्यांनी आपले उमेदवारीचे समर्थन भाजपाचे याच मतदार संघातील उमेदवार अनिल डबरासे यांना घोषित केले.त्यांच्या प्रताप अभ्यंकर यांच्या या निर्णयामुळे या मतदार संघातील उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा करून दिला.
काँग्रेसचा १२ जागांवर दावा
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत जिल्हा परिषद मतदारसंघातून सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे १२ सदस्य निवडून येतील, असा दावा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख व आ.वीरेंद्र जगताप, झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी केला आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसचे सर्वाधिक २९ सदस्य तसेच सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे तीन व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक असे एकूण ३३ सदस्य काँग्रेसकडे असल्याने हा विजय निश्चित मानला जात आहे. दुसरीकडे झेडपी मतदरसंघातून ९ जागांवर भाजपक्ष विजयी होईल, असा दावा झेडपीचे विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, प्रवीण तायडे व सहकारी पक्षाच्या नेत्यांंनी केला आहे.
मंगळवारी फै सला
जिल्हा नियोजन समितीच्या ३२ पैकी ६ जागा अविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे १० सप्टेंबर रोजी उर्वरित २६ जागांसाठी मतदान घेण्यात आले. याकरिता ४५ उमेदवार चारही मतदारसंघातून रिंगणात होते. या सर्व उमेदवारांच्या भाग्याचा फै सला १२ सप्टेंबर रोजी बचत भवन येथे होणाºया मतमोजणीतून होईल.

Web Title: 99.32 percent voting in the DPC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.