अल्पवयीन मुलीचे शोषण; फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी! 

By प्रदीप भाकरे | Published: October 13, 2022 07:53 PM2022-10-13T19:53:46+5:302022-10-13T19:54:54+5:30

अमरावती येथे अल्पवयीन मुलीचे शोषण करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

A case has been registered against the person who exploited a minor girl and threatened to spread her photo viral in Amravati | अल्पवयीन मुलीचे शोषण; फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी! 

अल्पवयीन मुलीचे शोषण; फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी! 

googlenewsNext

अमरावती : घरी एकट्या असलेल्या एका अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. आरोपी एवढयावरच थांबला नाही, तर त्याने त्या अत्याचाराचे फोटी आणि व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. ही धक्कादायक घटना १२ ऑक्टोबर रोजी गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. शेख इरफान शेख अनिस (३०) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पीडिताच्या पोटात दुखत असल्यामुळे आईने तिची विचारपूस केली. यावेळी तिने आपबिती कथन केल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ५ मे २०२२ रोजी मुलीची आई आणि भाऊ हे बाहेर गेले होते. ती घरी एकटी होती. त्यावेळी शेख इरफान मागील दाराने तिच्या घरात शिरला. त्याने तिला जिवाने मारण्याची धमकी दिली. तुझ्या भावाने माझ्या बहिणीशी लग्न केले. आता तुलाही माझ्याशी लग्न करावे लागेल, असे म्हणून त्याने पीडित मुलीचे लैंगिक शोषण केले. या प्रकाराचे त्याने मोबाइलमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढले. कुणाला काही सांगितल्यास कुटुंबीयांना जिवाने मारेन, अशी धमकी दिली.

पुन्हा कुकृत्य
१ जून २०२२ रोजी शेख इरफान पुन्हा पीडित मुलीला एकटी पाहून तिच्या घरात शिरला. आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. पीडिताच्या आईने गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपी शेख इरफानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ती घटना मोर्शी हद्दीतील असल्याने तो गुन्हा मोर्शी पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.

 

Web Title: A case has been registered against the person who exploited a minor girl and threatened to spread her photo viral in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.