एक तारीख अन् एक तास स्वच्छतेसाठी; कलेक्ट्रेटमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम, आरडीसींसह अधिकारी-कर्मचारी सहभागी
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: October 1, 2023 04:05 PM2023-10-01T16:05:30+5:302023-10-01T16:05:48+5:30
या अभियानात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंतीचे औचित्य साधून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ विवेक घोडके यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रविवारी तासभर परिसराची स्वच्छता केली.
अमरावती : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंतीचे औचित्य साधून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ विवेक घोडके यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रविवारी तासभर परिसराची स्वच्छता केली.
या मोहीमेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वांनी श्रमदान केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ ऑक्टोबरला कचरामुक्तीसाठी श्रमदान अभियान राबविण्याची सूचना केली होती. त्याची प्रभावी अंमलबजावणी जिल्हाभरात करण्यात आली. रविवारी सकाळपासूनच ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या अभियानात जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहे. त्यास उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. एक तास स्वच्छतेसाठी अंतर्गत सर्वांनी श्रमदान केल्याचे घोडके म्हणाले.