पीएम किसान लिंकवर क्लिक करताच शेतकऱ्याला पाच लाखांचा चुना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 11:20 IST2025-03-05T11:18:20+5:302025-03-05T11:20:55+5:30

Amravati : कृषिक्षेत्राशी संबंधित एका व्हॉट्सअॅप ग्रुपपासून राहा सावधान

A fraud of five lakhs to the farmer as soon as he clicks on the PM Kisan link | पीएम किसान लिंकवर क्लिक करताच शेतकऱ्याला पाच लाखांचा चुना

A fraud of five lakhs to the farmer as soon as he clicks on the PM Kisan link

लोकमत न्यूज नेटवर्क
करजगाव :
कृषिसेवा केंद्राच्या संचालकाने पीएम किसान योजनेच्या लिंकवर क्लिक करताच त्यांना पाच लाखांचा चुना लागला. तब्बल सहा महिन्यांनी फसवणुकीची तक्रार त्यांनी पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


अशोक मेहरे असे तक्रारदाराचे नाव आहे. ते कृषिक्षेत्राशी संबंधित एका व्हॉट्सअॅप ग्रुपशी जुळले आहेत. त्यावर २९ ऑगस्ट २०२४ रोजी 'पीएम किसान'ची एक लिंक आली. त्या लिंकवर मेहरे यांनी क्लिक केले. आणि पाठोपाठ त्यांच्या खात्यामधून ५ लाख ११ हजार १५५ रुपये काढले गेल्याचा संदेश प्राप्त झाला. मेहरे यांनी तक्रार दिली. शिरजगाव पोलिसांनी त्या अज्ञाताविरुद्ध ३ मार्च रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Web Title: A fraud of five lakhs to the farmer as soon as he clicks on the PM Kisan link

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.